प्रहारचा दणका, कारखान्याने दिले ऊस बिलाचे चेक
प्रतिनिधी – संजय साखरे
माढा, करमाळा तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांची इंदापूर तालुक्यातील कर्मयोगी शंकरराव पाटील घागरगाव या कारखान्याला गेल्या सहा महिन्यापूर्वी ऊस गळीत सिझन चालू असताना ऊस गाळपासाठी दिले होते, अद्याप ही त्या शेतकर्यांना न्याय मिळत नव्हता कारखान्यावर हेलपाटे घालण्याच्या पलीकडे त्यांच्या हाती काही लागत नव्हते. परंतु जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ मस्के पाटील यांच्या मार्गदर्शनात आणि उपाध्यक्ष रमेश पाटील यांच्या नेतृत्वात प्रहार करमाळा तालुका अध्यक्ष संदीप तळेकर यांच्या प्रयत्नामुळे कारखान्यावर गेल्या पंधरा दिवसापूर्वी आंदोलनाचे पत्र देण्यात आले होते.

या आंदोलनाच्या निवेदनाची दखल घेत . कारखान्याच्या प्रशासनाने सर्व शेतकऱ्यांची याआधी दहा दिवसापूर्वी पंचवीस ते तीस लाख रुपयाचे ऊस बिल चेक दारे शेतकऱ्यांना देण्यात आले होते. ही बातमी प्रसारित झाल्यावर शेतकऱ्यांनी प्रहार संघटनेचे संपर्क केला .आणि पुन्हा राहिलेल्या शेतकऱ्यांची मिळून 15 लाखांचे बिल त्यांच्या खात्यावर प्रहार संघटनेच्या माध्यमातून चेक स्वरूपात जमा झाले.

शेतकऱ्यांचे चेक टेंभुर्णी येथे शेतकऱ्यांच्या हाती सुपूर्द करण्यात आले. त्यावेळी सर्व शेतकऱ्यांनी प्रहार संघटनेचे मनापासून आभार मानले.
यावेळी प्रहार चे जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ मस्के पाटील ,जिल्हा उपाध्यक्ष रमेश पाटील, करमाळा तालुका अध्यक्ष संदीप तळेकर ,शिवसेनेचे नेते बापू पाटील ,युवा जिल्हा उपाध्यक्ष गणेश पवार ,विपुल गोरे, राष्ट्रवादी करमाळा तालुका उपाध्यक्ष रामभाऊ नलवडे, युवा सेना करमाळा अध्यक्ष दादा तनपुरे ,करमाळा तालुका उपाध्यक्ष सोमनाथ जाधव, धोका फार संघटना तालुका संपर्क प्रमुख सागर भाऊ पवार ,केम शहराध्यक्ष गोटू बोंगाळे ,अतुल ढावरे. केम गावचे शेतकरी भाऊसाहेब दौंड, दयानंद तळेकर, बाळकृष्ण जगताप, विजय खानट व करमाळा आणि माढा तालुक्यातील अनेक शेतकरी उपस्थित होते.