सोलापूर जिल्हा होमगार्ड कार्यालयाचे केंद्र नायक एकनाथ सुतार राष्ट्रपती पदकाने सन्मानित
करमाळा (सचिन जव्हेरी ):
सोलापूर जिल्हा होमगार्ड कार्यालयाचे पलटण नायक तथा प्रभारी केंद्रनायक एकनाथ सुतार यांना राष्ट्रपती पदकाने सन्मानित केले गेल्याने संपुर्ण सोलापूर जिल्ह्यातील गृहरक्षक दलामध्ये मोठ्या उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. गृहरक्षक दल व नागरी सुरक्षा विभागात गुणवत्ता पूर्ण सेवा बजावल्याबद्दल सोलापूर पलटन नायक एकनाथ सुतार यांना सदरचा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.


जिल्हा ग्रामीण पोलीस उपअधीक्षक तथा होमगार्डचे जिल्हा समादेशक हिम्मतराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर जिल्ह्यात होमगार्ड संघटनेचे उत्कृष्ट काम करणारे एकनाथ सुतार हे एक शिस्तप्रिय होमगार्ड अधिकारी म्हणून जिथे जिथे त्यांची सेवा झाली तिथे तिथे ते परिचित आहेत.यंदा राज्यातील 31 पोलिसांना शौर्य पुरस्कार चार जणांना राष्ट्रपती पदके 41 जणांना गुणवत्ता पूर्व सेवा पदके जाहीर झाले आहेत. त्यांच्या या पुरस्काराबद्दल अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मतराव जाधव, प्रशासकीय अधिकारी श्री.माळी , लिपीक विक्रांत मोरे, चव्हाण, जिल्ह्यातील सर्व होमगार्ड तालुका समादेशक अधिकारी यांनी अभिनंदन केले आहे.
पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून होमगार्ड कर्तव्य बजावतात त्यांची हिम्मत वाढावी काम करण्याचा उत्साह वाढवा , यासाठी पाठपुरावा केला.
– भूषणकुमार उपाध्याय पोलीस महासंचालक तथा गृहरक्षक दल महासामादेशक.
इमाने-इतबारे सेवा केल्याचे फळ निश्चित मिळते आणि आज मला मिळालेले राष्ट्रपती पदक हे त्याचेच द्योतक आहे. या कामी मला उत्तम मार्गदर्शन अप्पर पोलीस अधीक्षक तथा होमगार्डचे जिल्हा समादेशक हिम्मतराव जाधव यांचे लाभले असुन सोलापूर जिल्हा होमगार्ड कार्यालयाचे प्रशासकीय अधिकारी श्री. माळी, लिपीक विक्रांत मोरे, सुनिल चव्हाण यांनी खुप सहकार्य केल्याने मला प्रेरणा मिळत गेली…एकनाथ सुतार…केंद्र नायक सोलापूर जिल्हा होमगार्ड कार्यालय.