करमाळासोलापूर जिल्हा

खांबेवाडीची युवतीची पोलिस उपनिरिक्षकपदी गवसणी ; सावंत, वारे यांच्याकडुन सन्मान

प्रतिनिधी सुनिल भोसले

करमाळा तालुक्यातील खांबेवाडी येथील वैशाली अंबादास लवटे यांची पोलिस उपनिरीक्षक पदी निवड झाली असुन त्यांची नियुक्ती नवी मुंबई येथील कळंबोली पोलिस स्टेशन येथे झाल्याबद्दल सावंत गटाचे वतीने सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हा सरचिटणीस सुनील बापु सावंत यांचे शुभहस्ते शाल पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी सत्काराला उत्तर देताना वैशाली लवटे म्हणाले की मी खांबेवाडी सारख्या ग्रामीण भागात प्राथमिक शिक्षण घेतल तर माध्यमिक शिक्षण संगोबा येथील शाळेत तर यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात शिक्षण घेऊन पदवीधर झाले ग्रामीण भागातून शिक्षण घेऊन अधिकारी होऊ शकतो. आजचा हा सत्कार माझ्या भुमीत झाला हे मी विसरू शकणार नाही असे ते म्हणाल्या.

यावेळी कृ.उ.बा.समिती चे संचालक संतोष वारे. करमाळा अर्बन बॅंकेचे माजी उपाध्यक्ष फारूक जमादार हाजी फारूक बेग महाराज शिंदे. आदी जण उपस्थित होते.

ads
ads
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE