करमाळासोलापूर जिल्हा

हे आहेत करमाळ्याचे ५१ कारभारी ; उपसरपंचपदी राखीव नसताना महिलांनाही संधी

करमाळा समाचार 

करमाळा तालुक्यात 51 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या निवडी शांततेत पार पडल्या. तर बिनविरोध झालेली जेऊरवाडी ग्रामपंचायत सरपंचपदी उमेदवार दिला. पण उपसरपंचपदी जागा रिक्त ठेवण्यात आली आहे. तर अनेक ठिकाणी सरपंचपदाच्या मोहातून अनेकांनी पक्ष बदल बदल करत विरोधी गटात सामील होऊन सरपंच पदाची माळ आपल्या स्वतःच्या गळ्यात घालून घेतली आहे. त्यामध्ये निमगाव, देवीचामाळ, करंजे अशा ग्रामपंचायतीचा समावेश आहे.

तालुक्यात जगताप गट, पाटील गट, शिंदे गट व बागल गट यांनी आपापली दावेदारी दाखवताना विरोधी गटातील निवडून आलेले सदस्य आपापल्या गटात आणण्याचा प्रयत्न करीत सत्ता स्थापन केली. यामुळे बर्‍याच ठिकाणी बदल होताना दिसून आला आहे. काही ठिकाणी अविरोध सदस्यांनी आपले पाठिंबा दर्शवत त्या ठिकाणी विजय संपादन करून दिला. त्यामध्ये करंजे, साडे गावांचा समावेश आहे.

आळजापूर येथे खुल्या जागेवर अनुसूचित जाती मधून निवडून आलेल्या सदस्यास संधी देत सरपंच पदाची माळ रवी घोडके यांच्या गळ्यात घातली आहे. त्यामुळे जातीपातीच्या पलीकडे जात एक आदर्श सर्वांपुढे ठेवत आळजापुर ग्रामपंचायतीने नवीन फळी उभा केली आहे. तर भोसे येथे निवडणूक लढवताना एका गटातुन तर सरपंच पदाच्यामुळे विरोधी गटात जात सुरवसे यांनी आपल्या गटाला धक्का देत सत्ता स्थापन केले आहे.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE