कोपर्डी प्रकरणातील आरोपीची कारागृहात आत्महत्या
करमाळा समाचार
13 जुलै 2016च्या संध्याकाळी अहमदनगर जिल्ह्यातल्या कोपर्डी इथल्या एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली होती. त्यातील एका आरोपीने पुण्याच्या येरवडा कारागृहात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहीती समोर येत आहे. पप्पु शिंदे असे मयत आरोपीचे नाव आहे.

कोपर्डी प्रकरणाला आता सात वर्ष पूर्ण होत आली. सदरचे प्रकरण 2016 मध्ये घडले होते. तर मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने सदर प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात चालवले गेले. त्यामुळे तीनही आरोपींना 29 नोव्हेंबर 2017 ला अहमदनगर विशेष न्यायालयाने दोषी घोषित ठरवत फाशीची शिक्षा ठोठावली होती. घटनेच्या सोळा महिन्यानंतर विशेष न्यायालयाने तिघांना फाशीची शिक्षा जाहीर केली.

त्यामध्ये आरोपी जितेंद्र उर्फ पप्पू शिंदे यासह दोघांचा समावेश आहे व तर पप्पु याने पुणे येरवडा कारागृहात शिक्षा भोगत असताना आत्महत्या केल्याची माहिती समोर येत आहे. नेमकी कशा पद्धतीने व का आत्महत्या केली याची माहिती सध्या पोलीस घेत आहेत.