कृष्णाई इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज कात्रज मध्ये गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी
करमाळा समाचार
गुरू हे ब्रम्ह, विष्णू, व परब्रह्म यांचेच रूप मानले जाते. आपल्या भारतीय संस्कृतीत गुरूला ईश्वराचे स्थान दिले आहे. गुरू हे आपल्या आयुष्यातील अंध:कार दूर करून आपल्याला प्रकाशाकडे नेतात. भारतात आषाढ शुद्ध पौर्णिमेला गुरू पौर्णिमा साजरी केली जाते.
याचेच औचित्य साधून दिनांक 3 जुलै रोजी सकाळी दहा वाजता कृष्णाई इंटरनॅशनल इंग्लिश मेडियम स्कूल व ज्यूनियर काॅलेज मध्ये ही गुरू पौर्णिमा साजरी करण्यात आली.

यावेळी सोनाली पाडूळे मॅडम यांनी गुरू बद्दलचे महत्त्व सांगितले, तसेच आपल्या आयुष्यात गुरू बद्दलचे स्थान याचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केले. तसेच विद्यार्थ्यी प्रतिनिधी म्हणून कुमारी नेहा दिलीप दंगाने या विद्यार्थ्यीनीने गुरूंबद्दलचे मनोगत व्यक्त केले. तसेच बारावीच्या विद्यार्थ्यांनी गुरुंना फुल ना फुलाची पाकळी देऊन गुरू बद्दलचा आदर व्यक्त केला .

या कार्यक्रमाला कृष्णाई इंटरनॅशनल इंग्लिश मीडियम स्कूल अँड जुनिअर कॉलेज चा पूर्ण स्टाफ व विद्यार्थी उपस्थित होते गुरु पौर्णिमेचा कार्यक्रम हा खेळ मेळीच्या वातावरणामध्ये संपन्न झाला