करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

व्यसनी नवऱ्याच्या त्रासाला कंटाळुन विवाहीतेची आत्महत्या ; गुन्हा दाखल

करमाळा समाचार

नवऱ्याच्या दारू पिऊन सतत मारहाण करण्याच्या व व्यसनाच्या कंटाळा येऊन विवाहित महिलेने राहत्या घरी विषारी औषध पिऊन आत्महत्या केल्याची घटना निंभोरे तालुका करमाळा येथे घडली आहे. या प्रकरणी व्यसनी नवऱ्यावर करमाळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी उल्हास लांडगे तालुका माढा यांनी फिर्याद दिली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, लांडगे यांचे मुलगी विजया हिचे महावीर मारकड रा. निंभोरे यांच्यासोबत सोळा वर्षांपूर्वी लग्न झाले होते. मुलगी नवरा दारूच्या नशेत कायम मारहाण करत असल्याबाबत फोनवरून कळवत होती. तर तिचे आई-वडील हे नांदण्यासाठी समजूत घालत होते. यापूर्वीही डाव्या पायाच्या नडगीवर मारहाण केल्याने मुलीचा पाय फॅक्चर झाला होता.

तीन तारखेला दुपारी तीनच्या सुमारास लांडगे यांना सदर घटनेबाबत माहिती मिळाली. यावेळी विजया हिने राहते घरी विषारी औषध केले आहे अशी माहिती मिळाल्यानंतर तिला करमाळा येथील सरकारी दवाखान्यात नेण्यात आले होते. त्यावेळी तिला मृत घोषित करण्यात आले. यावेळी तिच्या अंगावर पाठीवर मारहाण केल्याचे व्रण दिसून येत होते असेही फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी पतीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE