कुळवाडी भूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराजांची शिवजन्मोत्सवास सुरवात
करमाळा समाचार
छत्रपती क्रांती सेना या सामाजिक संघटनेकडून करमाळ्यात कुळवाडी भूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराजांची शिवजन्मोत्सवास सुरवात करण्यात आली असल्याचे छत्रपती क्रांती सेनेचे सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब तोरमल यांनी दि १७ रोजी करमाळा येथे छत्रपती क्रांती सेना आयोजित एक कार्यक्रमात माहिती दिली.

यावेळी कार्यक्रमात बोलताना तोरमल म्हणाले कि, छत्रपती शिवाजी महाराजांचा संघर्ष हा कोणत्याही एक जाती, धर्माच्या विरोधातला न्हवता तर तो रयतेचे स्वराज्य निर्माण करण्याचा होता. परंतु काहींनी छत्रपती शिवाजी महाराजाचा चुकीचा इतिहास सांगून छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा हि मुस्लिम विरोधी दाखविण्याचा प्रयन्त केला.

खरे तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात पस्तीस टक्के मुस्लिम सैनिक होते, तोफखाना प्रमुख इब्राहिम खान मुस्लिम होता, छत्रपती शिवाजी महाराजांचे पहिले चित्र मीर मोहम्मद या मुस्लिम चित्रकाराने काढले, त्यांच्या गुरुपैकी एक बाबा याकूत हे मुस्लिम गुरु होते, आरमार प्रमुख दौलतखान दर्या सारंग हे मुस्लिम होते, महाराजांचे काही अंगरक्षक मुस्लिम होते यावरून सिद्ध होते कि छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम विरोधी नसून त्यांनी स्वराज्यातील सर्व बहुजन समाजाच्या कल्याणासाठी काम केले आहे. शेतकऱ्यांसाठी महाराजांनी सैनिकांना आदेश दिले होते कि, शेतकऱ्याला शक्य असेल तर शेतसारा घ्या अन्यथा घेऊ नका परंतु शेतकऱ्यांच्या भाजीच्या डेटालाही हात लावू नका. शिवाजी महाराज शेतकऱ्यांना शेतीसाठी बी बियाणे, औजारे तसेच बिनव्याजी कर्ज देत होते त्यामुळे शिवाजी महाराजांच्या काळात शेतकरी सुखा समृद्धीने जीवन जगात होता असे तोरमल यांनी सांगितले.
यावेळी छत्रपती क्रांती सेनेचे आर आर पाटील, शिवम कोठावळे, महावीर भोसले, अनिल कागदे, समाधान भोसले, विशाल चौगुले, प्रशांत पवार, अक्षय पाटील, बाबुराव पाटील, रावसाहेब जाधव यांच्यासह बहुजन क्रांती मोर्चाचे गजानन ननवरे, दिनेश दळवी, आदिनाथ माने, सागर बनकर, दत्ता डांगे, बुध्दिष्ट इंटरनॅशनल नेटवर्कचे गौतम खरात, भीमराव कांबळे, दीपक भोसले, राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाचे शहाबुद्दीन शेख, कय्युम शेख, जावेद मणेरी, राष्ट्रीय घुमंतू जनजाती मोर्चाचे अरुण माने, दिनेश माने, हनुमंत पांढरे आदीजण उपस्थित होते.