दिवंगत आमदार आण्णासाहेब जगताप यांचे सुपुत्र प्रकाश जगताप यांचे निधन
करमाळा –
माजी आमदार स्व. पांडुरंगराव (आण्णासाहेब) जगताप यांचे सुपुत्र निवृत्त उपप्राचार्य प्रकाश पांडुरंगराव जगताप यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले आहे. त्यांचे वय 75 होते. कर्जत येथे रयत शिक्षण संस्थेत त्यांनी उपप्राचार्य म्हणून काम केले होते. सकाळी 10.30 वाजता दत्त मंदिर बारा बंगले मागील स्मशानभूमी करमाळा येथे होईल. त्यांच्या पश्च्यात पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
