नेत्यांना सोडुन पदाधिकारी वळाले तुतारीकडे ; आबांच्या दौऱ्याला वाढता प्रतिसाद
करमाळा समाचार
महाविकास आघाडीचे माढा लोकसभा लोकसभेचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारार्थ करमाळ्याचे माजी आमदार नारायण पाटील यांनी शुक्रवार तीन मे रोजी सकाळी सात वाजल्यापासून त्याच्या दौरा सुरू केला आहे. या प्रचार दौऱ्या त्यांनी भाळवणी, वांगी, वडशिवणे, पांगरे, कविटगाव या गावांना दुपारपर्यंत भेटी दिल्या होत्या. रात्री दहा वाजेपर्यंत त्यांचा दौरा सुरू राहणार आहे. या दौऱ्याला मोठ्या प्रमाणावरती लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

यावेळी मोहिते पाटील यांना करमाळा तालुक्यातील मोठे मताधिक्य देणार असल्याचे माजी आमदार नारायण पाटील यांनी यावेळी सांगितले. नुकताच पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. या प्रवेशानंतर करमाळा तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेससाठी चांगले वातावरण निर्माण झाले आहे. मागील आठवड्यात कंदर येथे झालेल्या जाहीर सभेत राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाषणाची सुरुवात करताना नारायण पाटील हे येणाऱ्या विधानसभेत आमदार म्हणून जातील असे वक्तव्य केल्याने पाटील समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.


सध्या तालुक्यात महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्यासाठी वातावरण चांगले आहे. पाटील यांनी केलेल्या प्रवेशामुळे त्याला त्यात आणखी भर पडली आहे. मोहिते व नारायण आबा यांनी तुतारी कडे जावे अशी अपेक्षा लोकांची अपेक्षा होती त्यामुळे आता लोकही पाटील यांच्या पाठिशी उभा असल्याचे दिसत आहेत. तर नुकतेच हिसरे येथील शिंदे गटातील कार्यकर्त्यानीही याच मुद्द्यावर आबा यांच्याकडे प्रवेश केला आहे. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यानी आम्ही तुतारीकडे जात असल्याचे सांगितले. तर आबा, राष्ट्रवादी (श.प) व मोहितें या त्रिकुटामुळे तालुक्यात तुतारीला अच्छेदिन आले आहेत.