करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

शिक्षकदिनाचे औचित्य साधत शिक्षकांच्या विविध तपासण्यांचे आयोजन

करमाळा समाचार

जाधव -पाटील हॉस्पिटल करमाळा येथे रविवार दिनांक 3 सप्टेंबर 2023 रोजी शिक्षक दिनाचे औचित्य साधून खास शिक्षकांसाठी कार्डिओ व सर्जरी कॅम्प चे आयोजन करण्यात आले होते. त्यामधे Consultation/BP/BSL/ECG या तपासण्या मोफत करण्यात आल्या व काही शिक्षकांना आवश्यक असल्यास Stess Test व 2D Echo या तपासण्या 50% सवलती च्या दरात करण्यात आल्या.

सदर शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला जवळपास 100 शिक्षकांनी सहभाग नोंदवला व आपल्या आरोग्यविषयक तपासण्या करून घेतल्या सदर तपासण्या करण्यासाठी नामांकित डॉ.संदीप गाडे, डॉ.महेश घुगे, डॉ.प्रदीपकुमार जाधव -पाटील, डॉ.रोहन पाटील, डॉ.शिवानी पाटील, डॉ.सागर कोल्हे, डॉ.आशुतोष कापले, डॉ.अशोक शिंदे, डॉ.हर्षवर्धन माळवदकर व हाॅस्पिटल मधील स्टाफ यांनी परिश्रम घेतले

शिबिराची सुरूवात प्रथमतः मान्यवर डॉक्टरांचा सन्मान करून केली त्यावेळी पंचायत समिती शिक्षण विभागाचे विस्तार अधिकारी श्री सुग्रीव नीळ साहेब, श्री आदिनाथ देवकते, श्री निशांत खारगे, श्री बाळासाहेब वाघमोडे , श्री मधुकर शिंदे , श्री अरूण चौगुले, श्री सतिश चिंदे, श्री विनोद वारे, श्री सुनिल नरसाळे, श्री अजित कणसे, श्री दादासाहेब जाधव, श्री शकूर शेख , श्री प्रताप राऊत, श्री मुचकुंद काळे श्री अशोक दुधे, श्री सयाजीराजे ओंभासे, श्री राजकुमार खाडे, श्री नानासाहेब मोहिते, श्री विक्रम राऊत त्याचबरोबर शंभर शिक्षक उपस्थित होते

शिबीर यशस्वी करण्यासाठी सोलापूर जिल्हा जुनी पेंशन संघटनेने खूप परिश्रम घेतले अशी माहिती सोलापूर जिल्हा जुनी पेंशन संघटनेचे जिल्हा नेते श्री तात्यासाहेब जाधव यांनी दिली.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE