करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

करमाळा येथील श्री कमलादेवी कन्या विदयालयात कायदेविषयक शिबीर संपन्न

करमाळा

दि.१८.०६.२०२५ रोजी सकाळी १०.३० वाजता श्री. कमलादेवी कन्या विदयालय, करमाळा ता. करमाळा येथे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा न्यायाधीश मा. मनोज एस. शर्मा साहेब व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव श्री. एम.पी. शिंदे साहेब व तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष श्री. संजय मो. घुगे यांचे मार्गदर्शनानुसार कायदेशीर शिबीराचे आयोजन करण्यात आले.

सदर कार्यक्रमास तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर, करमाळा श्री. संजय मो. घुगे तसेच करमाळा बार असोसिएशनचे अध्यक्ष श्री. आर.बी. निळ, उपाध्यक्ष श्री. अॅड. ए.एच. पठाण, अॅड. श्रीमती आर. आर. शिंदे, अॅड. कु.एम.बी. चांदणे, अॅड. इंगळे, अॅड. पिंपरे, सहा. पोलीस निरीक्षक गिरीजा मस्के, विदयालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती मुक्ता शेलार व इतर शिक्षक वृंद आदी मान्यवर उपस्थित होते.

सदर कार्यक्रमाचे सुत्र संचलन श्री. एस. एल. जाधव वरिष्ठ लिपीक यांनी केले. सदर कार्यक्रमास प्रास्ताविक अॅड.ए.एच. पठाण यांनी केले. पोस्को कायदा या विषयावर अॅड. श्रीमती आर.आर. शिंदे, अॅड. एम. बी. चांदणे यांनी समाजातील महिलांची सुरक्षितता आणि गोपनीयता या विषयावर तर सहा. पोलीस निरीक्षक गिरीजा मस्के यांनी आतरराष्ट्रीय योग दिन या विषयावर विदयार्थीनींना मान्यवरांनी मार्गदर्शन केले.

ads

मा. न्यायाधीश श्री. संजय मो. घुगे साहेब यांनी अध्यक्षीय भाषणात सर्व विषयांचा सारांशमध्ये समजावून सांगून सर्व विदयार्थीनींनी धाडसाने व आत्मविश्वासाने अभ्यासपुर्वक प्रयत्न करुन यश संपादन करण्याचे आवाहन केले तसेच जागतिक बाल कामगार विरोधी दिनाचे महत्व विषद केले

सदर कार्यक्रमास श्री कमलादेवी कन्या विदयालय, करमाळा येथील ३०० विदयार्थीनी उपस्थित होत्या. सदर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सहशिक्षक श्री. भीष्माचार्य चांदणे सर यांनी केले.

ads
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE