करमाळासोलापूर जिल्हा

चहुबाजुंनी शेतकऱ्यांची लुट सुरुच ; कोरोना बीलांनंतर बियांनांच्या कृत्रिम टंचाईचे संकट

कोरोना काळात शेतकरी आधीच आव्वाच्या सव्वा बीलांमुळे त्रस्त झाला होता. त्यावेळी तर शेतमालही विकला जात नव्हता. आता कसा बसा उभारी घेऊन पेऱणी करावी असा विचार करीत असताना बियांची कृत्रीम टंचाई समोर आली आहे. त्यात आता शंभुराजे जगताप यांनी लक्ष दिले आहे.

करमाळा समाचार 

करमाळा तालुक्यात मान्सूनचे आगमन लवकर झाले असून शेतकऱ्यांना पेरणीसाठी बियाणांची मोठ्या प्रमाणावर आवश्यकता आहे. करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी बियाणांच्या बाबतीत आयच्यावर अन्याय होत आहे,अशी तक्रार युवा नेते शभुराजे जगताप यांच्याकडे करताच, शंभूराजेंनी यावर ताबडतोब लक्ष दिले, त्यांनी तहसीलदार समीर माने साहेब, करमाळा, कृषी अधिकारी चव्हाण साहेब करमाळा यांची तातडीने भेट घेऊन शेतकऱ्यांवर होत असलेल्या अन्याया बद्दल चर्चा केली.

करमाळा तालुक्यात बियाण्यांचा तुटवडा भासत आहे, व ज्या ठिकाणी बियाणे उपलब्ध होत आहेत, तिथे आहे त्या किंमतीपेक्षा जास्त किंमत लावून बियाणांची विक्री केली जात आहे. शेतकऱ्यांना जी बियाणे आवश्यक आहेत, त्या बियाणाां बरोबर जोड बियाणे/ इतर बियाणे घेण्यास भाग पाडले जात आहे. सध्या कोरणा च्या पार्श्वभूमीवर गेली पंधरा महिने, सर्व शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती कोरोनाशी झुंज देताना ढासळलेली आहे.

ads

आता पाऊस चांगला झाला असताना पेरणीसाठी शेतकऱी बियाणांसाठी कसे- बसे पैसे उभा करत आहे, शेतकऱ्याला जर बियाण्यांसाठी, आहे त्या किंमतीपेक्षा जास्त किंमत द्यावी लागत असेल, तर ते मला कदापी मान्य नाही, असे शंभूराजेंनी सांगितले. यावर आपण त्वरित कार्यवाही करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा व शेतकऱ्यांना योग्य दरात चांगल्या दर्जाची त्यांना आवश्यक असलेली बियाणेच मिळावीत अशी मागणी शंभूराजेंनी केली.

ads
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE