करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

करमाळा विधानसभेसाठी महाविकास आघाडीची उमेदवारी जाहीर ; तुतारी चिन्हावर लढणार नारायण आबा

करमाळा समाचार 

करमाळा विधानसभा मतदारसंघासाठी महाविकास आघाडीच्या वतीने राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नारायण पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. सदरचा उमेदवारी अर्ज आज भरणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संतोष वारे यांनी दिली. तर महायुतीच्या उमेदवाराची अद्याप घोषणा होणे बाकी आहे. त्यानंतर संपूर्ण चित्र स्पष्ट होईल.

लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान राष्ट्रवादीत प्रवेश करीत करमाळा तालुक्यातून महाविकास आघाडीला मोठ्या प्रमाणावर मताधिक्य देण्यात माजी आमदार नारायण पाटील यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली होती. तर त्यावेळीपासूनच विधानसभेसाठी प्रमुख दावेदार म्हणून पाटील यांच्याकडे पाहिले जात होते.

मागील काही दिवसांपासून सदरची जागा उद्धव ठाकरे गट किंवा राष्ट्रवादी यापैकी कोणाला सुटेल अशा चर्चा सुरू होत्या. परंतु पवारांनी पाटील यांच्यावर विश्वास दर्शवल्याची दिसून आले आहे. थोड्या वेळात निवडणूक उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी नारायण पाटील दाखल होणार आहेत.

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE