मकाई निवडणुक – मतदान प्रक्रिया पुर्ण अंतीम टक्केवारी सर्वातआधी करमाळा समाचारवर
करमाळा समाचार
मकाई सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत आज मतदान प्रक्रिया पार पडली. सर्वाधिक मतदान मांगी येथे तर सर्वात कमी मतदानाची टक्केवारी चिकलठाण येथे नोंदवण्यात आली आहे. तर एकूण मतदान 56.93 टक्के मतदान नोंदवण्यात आले आहे. जलद माहीती घेण्याच्या नादात यात थोडा बदल अपेक्षीत आहे पण सर्वात आधी दिलेली बातमी टक्केवारीच्या जवळची असणार हे नक्की.

मकाई सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीला सकाळी आठ वाजता सुरुवात झाली. यावेळी मतपेट्यांचे पूजन करून पुढील मतप्रक्रियेला सुरुवात करण्यात आली होती. तालुक्यातील 41 केंद्रांवर मतदान पार पडले.

भिलारवाडी गटात 55. 72 टक्के मतदान.
पारेवाडी गटात 59. 69 टक्के,
चिखलठाण – 44. 57 टक्के
वांगी – 57.27 टक्के
मांगी – 66.63 टक्के मतदान झाले आहे. सदरची मतमोजणी दि 18 रोजी सकाळी 8 वाजल्यापासुन यशवंतराव चव्हाण बहुदेशीय सभागृह चव्हाण कॉलेज येथे होणार आहे.