मकाई निवडणुक – बोगस कागदपत्रे देणाऱ्यांवर फौजदारी दाखल करा – राजेभोसले
करमाळा प्रतिनिधी
मकाई सहकारी साखर कारखाना निवडणुक छाननीत सत्ताधाऱ्यांनी हरकती बरोबर जोडलेले विरोधकांचे सर्वच येणे बाकी दाखले बोगस असल्याचे आढळून आल्याची तक्रार राजेभोसले यांनी केली आहे. दाखल्यावर आदिनाथ ऐवजी मकाई च्या कार्यकारी संचालकांचे शिक्का मारलेले दाखले सत्ताधारी गटाकडुन हरकती बरोबर जोडले आहेत आशा बोगस दाखल्यावर सुनावणी झाली आहे असा आरोप त्यांनी केला आहे. यावर निवडणुक आयोग, सहकारमंत्री, साखर आयुक्त, प्रादेशिक साखर संचालक, निवडणुक निर्णय अधिकारी यांचे कडे तक्रार दाखल करुन आंदोलन करणार असल्याचे सवितादेवी राजेभोसले यांनी सांगितले आहे. तसेच बोगस कागदपत्रे तयार करून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची दिशाभूल केली म्हणून फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी विरोधी गटाकडून होणार आहे. यावर आता काय कारवाई होणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. यासंदर्भात प्रशासनाची बाजु ऐकुन घेण्याचा प्रयत्न सुरु आहे. अद्याप संपर्क होऊ शकला नाही.
