Uncategorized

केम येथे त्वरित 1000 लस उपलब्ध करुन द्या – विजयसिंह ओहोळ

केम प्रतिनिधी 

करमाळा तालुक्यातील केम येथे आरोग्य विभागात लसीचा मोठा तुटवडा जाणवत आहे, 45 वर्षाच्या वरील जवळपास 75 % लोकांना अजूनही लसीचा 1 ला डोस मिळाला नाही. गावातील कोरोना बधितांची परिस्थिती गंभीर बनत चालली आहे, दिवसेंदिवस रुग्ण वाढत आहेत, बरेचसे रुग्ण दगावले देखील आहेत. म्हणुन केम येथे त्वरित 1000 लस उपलब्ध करुन द्या अशी विजयसिंह ओहोळ यांनी केली आहे.

गावातील आरोग्य विभाग, ग्रामपंचायत, व तालुका तहसीलदार यांना नम्र विनंती आहे की गावातील कोरोना परिस्थिती लक्षात घेता सुरवातीला दोन दिवसांत 1000 लस प्रशासनाने त्वरित उपलब्ध करावी अन्यथा केम-करमाळा आरोग्य विभागाची तक्रार जिल्हाधिकारी व आरोग्यमंत्री यांच्याकडे केली जाईल. ज्या रुग्णांची नोंदणी ऑनलाईन होत नसेल तर त्यांना आधार कार्ड द्वारे ऑफलाईन नोंदणी करून लस देण्यात यावी व 18 वर्षाच्या वरील व्यक्तींचा देखील विचार गांभीर्याने करावा. याची नोंद प्रशासनाने त्वरित घ्यावी.

ads
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE