Uncategorized

मोठ्या कारणामुळे आजही आ. रोहित पवारांचा अदिनाथशी संबंध नाही ; यंदाही कारखाना बंदच

करमाळा समाचार 

मागील दोन वर्षांपासून कारखाना बंद आहे. तर गेल्या वर्षी राज्य सहकारी बँकेने कारखान्याचा टेंडर काढून कारखाना भाडेतत्त्वावर देण्यासाठी नियोजन केले होता. परंतु त्याला एनसीडीसी बँकेनेही विरोध करून न्यायालयात खेचले आहे. त्यामुळे यंदाही कारखाना सुरू होण्याच्या आशा मावळल्या आहे. मुळातच हा कारखाना अद्यापही आ. रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रो च्या ताब्यात गेलेला नसल्याने ते यात काहीच करू शकत नाही हे स्पष्ट झाले आहे.

कारखान्याचा टेंडर भाडेतत्त्वावर पंचवीस वर्षासाठी घेण्यासाठी रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रो लि निविदा दिल्या होत्या. त्या मंजुरीही झाल्या परंतु पुढील नियोजन होण्यापूर्वीच दिल्लीच्या एनसीडीसी बँकेने त्याला विरोध केला व पुन्हा ते प्रकरण रखडले. त्यामुळे अद्यापही सदरचे कारखान्याचे नियोजन हे राज्य सहकारी बँकेच्या ताब्यातच आहे. त्यामुळे आ. रोहित पवार हे कारखाना सुरू करू शकणार नाही अशी ही माहिती असतानाही काही जण मुद्दामून रोहित पवारांकडे बोट दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. मुळातच जो कारखाना आजही पवार यांच्याकडे आलेला नसेल त्या कारखान्यावर पवार कसं काय निर्णय घेऊ शकतील हा मोठा प्रश्न आहे.

आदिनाथ संचालकांनी सदरचा कारखाना भाडेतत्त्वावर देण्यासाठी ठराव केला आहे. राज्य सहकारी बँकेने कर्जापोटी सदर चा कारखाना ताब्यात घेतला आहे. पुढे हा कारखाना भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय झाला परंतु एनसीडीसी या बँकेचे ही कर्ज असल्याने फक्त राज्य सहकारी बँक भाडे तत्त्वाचा निर्णय घेऊ शकत नाही. त्यामुळे हे प्रकरण आता न्यायालयात गेले आहे. त्यामुळे अद्यापही हा कारखाना पवार यांच्या ताब्यात गेल्या नसल्याने आजही त्यांचा या कारखान्याची संबंध जोडणे चुकीचे आहे.

उस उत्पादन वाढले , उस उत्पादक शेतकरी अडचणीत वाढ …
तालुक्यात एकुण चार साखर कारखाने आहेत. संपुर्ण तालुक्यात जवळपास तीस लाख मेट्रीक उसाचे उत्पादन होते. यंदा ते वाढुन ३५ लाख मेट्रीक च्या पुढे जाण्याची शक्यता आहे. अदिनाथ चे साधारणतः चार ते सात लाख मेट्रीक उस गाळप होतो. आधीच अतिरिक्त उसाचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे साखर कारखाना सुरु न झाल्यास उस उत्पादक शेतकऱ्यांना तालुक्याबाहेरील कारखान्यांच्या पाया पडण्याशिवाय पर्याय राहणार नाही. त्याशिवाय भाडेतत्वावर करार पुर्ण न झाल्याने अदिनाथ मध्ये जवळपास ६५ कोटी रुपयांची दोन लाख २९ हजार क्विंटल साखर शिल्लक असुन प्रक्रिया रखडल्यामुळे साखर खराब होण्याचा धोका आहे.

वेतनाअभावी कर्मचाऱ्यांचे हाल ..
मागील चार वर्षांपासून आदिनाथ सहकारी साखर कारखाना डबघाईला गेला आहे. बँकांची कर्ज प्रकरणे तसेच विविध देणी थकलेल हा कारखाना सध्या बंद अवस्थेत आहे. कारखाना बंद होण्यापूर्वी पासून कर्मचाऱ्यांचे पगारी थकीत आहेत. त्यांच्यावर उपासमारीची वेळ आले आहे. त्यातच सध्या सुरू असलेल्या वादामुळे अधिकच पाय खोलात जाण्याची शक्यता असल्याने बॅंका व नेते व वाद-विवाद सुरूच राहतील पण कर्मचाऱ्यांचे काय ? असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE