परतीच्या पावसामुळे नुकसानग्रस्त झालेल्या पिकांचे पंचनामे तात्काळ करा
करमाळा समाचार
करमाळा तालुक्यातील पश्चिम भागामध्ये परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्यामुळे खरीप हंगामातील पिकांचे तसेच शेतकऱ्याच्या शेतामध्ये उभा असलेल्या कांद्या पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. अशा नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे तात्काळ करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी श्रीमंत नितीनराजे बॉबीराजे राजभोसले यांनी केली आहे.

करमाळा तालुक्यातील इतर भागातील मंडळामध्ये नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे चालू आहेत. परंतु करमाळा तालुक्यातील पश्चिम भागामध्ये नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे अद्याप पर्यंत झालेली नाही. ते त्वरित चालू करण्यात यावेत अशी मागणी एँडवोकेट श्रीमंत नितीनराजे बॉबीराजे राजेभोसले यांनी तहसीलदार साहेब करमाळा यांना केली आहे.
