करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

विरोधकांचे आव्हान टिकणार का संपणार आज फैसला ; 21 तक्रारींवर सुनावणी

करमाळा समाचार

मकाई सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये तब्बल ३९ उमेदवाराच्या अर्जांवर हरकती घेण्यात आल्या होत्या.. त्या अर्जावर घेतलेल्या निर्णयाविरोधात २१ उमेदवार प्रादेशिक सह संचालक (साखर ) सोलापूर विभाग यांच्याकडे दाद मागण्यासाठी गेले होते. यावर सोमवारी सोलापूर येथे सुनावणी होणार आहे. त्यासाठी संपूर्ण यंत्रणा सज्ज झाली आहे. यातून होणाऱ्या निकालावर मकाईचं पुढचे निवडणुकीचे भवितव्य अवलंबून राहणार आहे.

https://chat.whatsapp.com/BvGn1TkKk7D2LkJO5a7wXp प्रत्येक बातमी सर्व गृप वर टाकली जात नाही. सर्व बातम्या वाचण्यासाठी या लिंक ला क्लिक करुन गृप ला जॉईन व्हा. 

सदरच्या अर्जांमध्ये दत्तकला शिक्षण संस्थेचे संस्थापक प्रा. रामदास झोळ व माया झोळ यांच्यासह माजी जिल्हा परिषद सदस्या तथा मोहिते पाटील समर्थक गटाच्या नेत्या सवितादेवी राजेभोसले यांच्यासह २१ तक्रारी अर्जावर सदर सुनावणी होणार आहे. यामध्ये राजेभोसले व झोळ गटातील उमेदवार यांच्या बाजूने निकाल लागल्यास नक्कीच निवडणूक रंगतदार स्थितीत जाण्याची शक्यता आहे. पण सदर निकाल हा जैसे थे ठेवला. तर मात्र विरोधकांचा आव्हान संपुष्टात येऊन बागल गट मकाई निवडणुकीत अविरोध सत्तेत येणे जवळपास निश्चित होईल.

उमेदवारी अर्ज अपात्र ठरवल्यामध्ये माया झोळ, प्रवीण बाबर, माया झोळ, रामदास झोळ, माया झोळ, अशोक जाधव, प्रविण बाबर, सुधीर साळुंखे, अश्विनी फाळके, अश्विनी फाळके, गणेश कांबळे, तानाजी देशमुख, मारुती बोबडे, आण्णासाहेब देवकर, संतोष वाळुंजकर, भगवान डोंबाळे, सवितादेवी राजेभोसले, विशाल शिंदे , नंदकुमार पाटील, विशाल शिंदे, अंकुश भानवसे, कमल पाटील, कैलास कोकरे असे एकुण २१ अर्ज तक्रारीत गेले आहेत.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE