महाराणा प्रताप जयंती काव्य स्पर्धेत माने, श्रीवास्तव आणी होरणे विजेते ; तालुकास्तरीय स्पर्धेची सांगता
करमाळा समाचार
क्षत्रिय वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह यांच्या ९ मे रोजी संपन्न झालेल्या जयंतीनिमित्त घेतलेल्या काव्य स्पर्धेला भरभरून प्रतिसाद मिळाला. कविता जगताना व लिहिणार्या आम्ही या साहित्यिक मंच ने ही स्पर्धाआयोजित केली होती. साहित्यिका व अखिल भारतीय क्षत्रिय महासभा-प्रदेश च्या अंजली राठोड श्रीवास्तव यांच्या कल्पनेतून काल काव्य स्पर्धा घेण्यात आल्या होत्या.

तालुका स्तरावरील या काव्य स्पर्धेत अर्चना माने प्रथम तर द्वितीय व तृतीय अनुक्रमे मितवा श्रीवास्तव व रत्नमाला ह़ोरणे यांना सन्मानित करण्यात आले.

तसेच चतुर्थ व पंचम क्रमांकावर अनुक्रमे प्राची सरवदे व विजयालक्ष्मी गोरे यांना सन्मानित करण्यात आले.
उत्तेजनार्थ मध्ये सारिका पुराणिक, सुलभा खुळे,हेमा विद्वत , सुजाता अनारसे यांना ही गौरविण्यात आले. लक्षवेधी कविता म्हणून विनया घोलप पवार (पुणे)यांच्या कवितेची निवड करण्यात आली. हा निकाल देण्याचं काम मुंबई च्या साहित्यिका मा.संजीवनी राजगुरू यांनी अगदी चोखपणे पार पाडले.
डॉ श्रीराम परदेशी, डॉ.बिपीन परदेशी ,मा. झनकसिंग परदेशी मा.पंकज परदेशी, जेष्ठ साहित्यिक डॉ सत्यपाल श्रीवास्तव,मा. दिनेश राठोड यांनी विजेत्यांचे अभिनंदन केले. मान्यवरांच्या हस्ते पुस्तके भेट देऊन कवयित्रींचा सन्मान करण्यात आला.