करमाळासोलापूर जिल्हा

महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी मनोहर भोसलेंना जामीन मंजुर

प्रतिनिधी – बार्शी 

महिलेवर अत्याचार प्रकरणी अटकेत असलेले मनोहर मामा भोसले यांना बार्शी येथील जिल्हा सत्र न्यायालयाकडून दिलासा मिळाल्याचे दिसून येत आहे. सुरुवातीला बारामती येथील दुसऱ्या गुन्ह्यात अटकेत असताना त्यांना त्या ठिकाणी जामीन मिळाला होता. तर करमाळा येथे दाखल झालेला पुण्यात मात्र दिलासा मिळत नव्हता. पण आज जिल्हा सत्र न्यायालयाने मनोहर भोसले यांना काही अटींच्या अधीन राहून जामीन मंजूर केला आहे. भोसले यांच्या जामिनासाठी ॲडवोकेट रोहित गायकवाड, श्रीगोंदा यांनी काम पाहिले.

सप्टेंबर 2021 पासून अटकेत असलेले मनोहर भोसले यांच्यावर दोन वेगवेगळे गुन्हे दाखल झाले होते. पहिला बारामती येथे जादूटोणा व आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल होता. तर दुसरा गुन्हा करमाळा तालुक्यात दाखल झाला त्यात साताऱ्यातील महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. पहिल्या गुन्ह्यात अटकेत असताना न्यायालयीन कोठडी मिळाली तेव्हाच करमाळा पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन तपास सुरू केला होता. तेव्हापासून ते अटकेतच आहेत. आज पर्यंत ते जामिनासाठी प्रयत्न करत होते परंतु आज अखेर त्यांना जामीन मिळताना दिसत आहे.

politics

सध्या मनोहर भोसले हे अकलूज येथील एका खासगी दवाखान्यात उपचार घेत आहेत. मागील महिन्यात त्यांच्यावर एक शस्त्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यावर सध्या उपचार सुरू असून हा मिळाला जामीन त्यांना मोठा दिलासा मानला जात आहे. तर काही दिवसांपूर्वी करमाळा पोलिसांच्या वतीने भोसले यांच्या प्रकरणातील आरोपपत्र दाखल केले आहे. त्यामुळे जामीन मिळणे अपेक्षित होते. त्या पद्धतीने सोमवारी झालेल्या सुनावणीवर अखेर आज बार्शी जिल्हा सत्र न्यायालयाने दिलासा देत भोसले यांचा जामीन काही अटींच्या अधीन राहून मंजूर केला आहे.

भोसले यांच्या प्रकरणात संबंधित महिलेच्या जिल्ह्यात भोसले यांना जाण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे. तर पंचवीस हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर त्यांचा जामीन मंजूर करण्यात आला आहे. शिवाय त्यांनी राहत असलेला पत्ता बदलण्या पूर्वी परवानगी घेणे गरजेचे असल्याचेही अटींमध्ये नोंद करण्यात आली आहे. तर कार्यालयीन कामकाज आटपून लवकरात लवकर मनोहर भोसले यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न राहील असे त्यांचे वकील रोहित गायकवाड यांनी सांगितले.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE
Audio Player
WhatsApp Group