मनोहर भोसले उपचारानंतर पुन्हा एकदा न्यायालयात
नुकतीच हाती आलेली माहीती अशी की मनोहर भोसले यांना दि १ ऑक्टोबर पर्यत पोलिस कोठडी सुनावली आहे.
करमाळा समाचार

तब्बल चार दिवसांच्या उपचारानंतर मनोहर भोसले यांना पुन्हा एकदा करमाळा न्यायालयात हजर करण्यात आले. गुरुवारी रात्री छातीत दुखत असल्याचे कारण करून मनोहर भोसले हे उपजिल्हा रुग्णालय त्यानंतर सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात उपचार घेण्यासाठी गेले होते.

दरम्यान त्यांची पोलीस कोठडी सुरू होती. परंतु पोलिसांना फक्त तीनच दिवस तपासासाठी वेळ मिळाला. त्यामुळे आज पुन्हा पोलिसांनी सात दिवसाची पोलिस कोठडीची मागणी केली. दुपारी दोन्ही बाजुची परिस्थिती जाणुन घेतल्यानंतर थोड्या वेळाने आपला निर्णय न्यायालय राखुन ठेवला होता.
महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी तसेच विविध कारणाने चर्चेत आलेले उंदरगावचे मनोहर भोसले यांना मागील चार दिवसांपूर्वी सोलापूर येथे उपचारासाठी दाखल केले होते. त्या ठिकाणी उपचार सुरू असताना आज करमाळा न्यायालयाने सुनावलेली सात दिवसांची पोलीस कोठडीची संपल्यानंतर करमाळा पोलिसांनी उपचाराचे कारण सांगून न्यायालयीन कोठडीची मागणी केली होती.
तात्पुरत्या स्वरूपाची न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर भोसले यांच्यावर उपचार सुरू होते. त्याच दिवशी रात्री मनोहर भोसले यांना दवाखान्यात उपचार पूर्ण केल्याने डिस्चार्ज देण्यात आला. त्यानंतर मंगळवारी त्यांना पुन्हा एकदा न्यायालयात उभे करण्यात आले. यावेळी उर्वरित पोलीस कोठडीची शिफारस करण्यात आली.