दिग्गज संघ आणि आयकॉन आज समोरासमोर भिडणार ; जेऊर येथील सामन्यांचा अखेरचा दिवस
करमाळा समाचार
मागील चार दिवसांपासून सुरू असलेल्या आज समारोप होणार आहे. दुपारी सेमी फायनल तर रात्रीच्या विजेच्या प्रकाशात अंतिम सामना खेळवला जाणार आहे. भव्य आणि दिव्य असे आयोजन गजराज स्पोर्ट्स यांच्या वतीने करण्यात आले आहे. अतिशय उल्लेखनीय नियोजन करण्यात आले आहे. सामनेही चुरशीचे होत असून याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

मागील चार दिवसांमध्ये एक संघ हा सेमी फायनल पर्यंत वजन वारी पोहोचला असून आज त्यांच्या दरम्यान सामने होताना दिसणार आहे. आज दिवसभरात आयकॉन म्हणून विठ्ठल चव्हाण, प्रथमेश राठोड, बंटी पटेल, सुरज कापसे, सुरज गुप्ता. शरद पारगे, शफिक शेख, अक्षय वाटरकर, शुभम शेळके, ऋतिक गजर आदि खेळताना दिसणार आहेत.

उपांत्यपूर्व फेरीतील सामने सुरु आहेत. तर उपांत्यफेरीत भीमानगर, कुर्डुवाडी यांनी धडक मारली आहे. आज उपांत्यपूर्व फेरीतुन दोन संघ पुढे जाणार आहेत. यामध्ये संघर्ष होताना दिसणार आहे. आज दुपारी सामन्यांना सुरुवात झाली आहे. या सर्व सामन्यांचे थेट प्रक्षेपण https://www.youtube.com/live/rpx91hMizcc?si=4JpeeYXXX2fMWkLQ
या लिंकवर बघता येईल.