BREAKING NEWS – मनोहरमामा भोसलेची तब्बेत बिघडली ; पुढील उपचारासाठी पाठवले
करमाळा समाचार
महिलेवर आत्याचार प्रकरणात अटकेत असलेल्या मनोहरमामा भोसले यास सोमवारी न्यायालयात उभे केल्यानंतर प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी आर. ए. शिवरात्री यांनी सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. परंतु चौथ्या दिवशी त्यांच्या छातीत दुखु लागल्याने पुन्हा दवाखान्यात नेले यावेळी त्याना सोलापूर येथे पाठवण्यात आले आहे.

उंदरगाव येथील भोंदू बाबा मनोहर भोसले यांच्यावर आर्थिक फसवणूक प्रकरणी बारामती येथे व करमाळा पोलीस ठाण्यात महिलेवर अत्याचार प्रकरणी (दि ९) एकाच दिवशी गुन्हे दाखल झाले होते. दुसऱ्या दिवशी सालपे ता. लोणंद जिल्हा सातारा येथून पुणे स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी भोसले यांना ताब्यात घेतले. व दि ११ रोजी बारामती न्यायालयात हजर केले. यावेळी त्यांना पाच दिवसाची पोलीस कोठडी मिळाली. नंतर ती वाढून १९ सप्टेंबर पर्यंत करण्यात आली होती. दरम्यान करमाळा पोलिसांनी सर्व कार्यवाही पूर्ण करत बारामती गाठले व त्या ठिकाणी जाऊन आरोपीला न्यायालयीन कोठडी मिळावी यासाठी प्रयत्न केले.
धक्कादायक बातमी –
कुंकु गल्ली येथील संजय पांढरे यांचे निधन ; अकलुज येथे घेतला अखेरचा श्वास https://karmalasamachar.com/sanjay-pandhare-of-kunku-galli-passed-away-he-took-his-last-breath-at-akluj/

पोलिसांनी केलेल्या नियोजनानुसार भोसले यांना न्यायालयीन कोठडी मिळाली व लगेच करमाळा पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन महिलेच्या आत्याचार प्रकरणात करमाळा येथे आणले. सोमवारी त्यांना करमाळा येथील न्यायालयात हजर केल्यानंतर येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी श्री शिवरात्री यांनी सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. पण गुरुवारी रात्री साडे आकरा वाजता भोसले यांना अत्यवस्थ वाटु लागल्याने त्यांना सोलापूर येथे हलवण्यात आले आहे.