मराठा समाजाकडे क्षमता पण आरक्षण नसल्यामुळे पिछाडीवर – ब्राम्हण महासंघ
करमाळा समाचार
महाराष्ट्रात सुरू असलेल्या मराठा आंदोलनाला वाढता पाठिंबा दिसत असताना आता करमाळा तालुक्यातील ब्राह्मण महासंघ देवीचा माळ यांनीही मराठा समाजाला पाठिंबा जाहीर करीत निवेदन दिले आहे. यावेळी सर्व मराठा बांधवांसोबत महिला भगिनी उपस्थित होत्या. या दरम्यान ब्राह्मण समाजाच्या वतीने पाठिंबा दिला आहे.

यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना श्रीनिवास पुराणिक यांनी मराठ्यांचे महाराष्ट्रात व देशात असलेल्या योगदानाबद्दल भाष्य केले. तर कशा पद्धतीने मराठा समाज आज पिछाडीवर पडत चालला असून समाजातील विद्यार्थ्यांना आरक्षणाशिवाय पर्याय उरला नाही हे पटवून सांगितले. त्यामुळे आजच्या घडीला समाजाच्या विद्यार्थ्यांमध्ये व युवकांमध्ये क्षमता जरी असली तरी आरक्षणामुळे त्यांना संधी मिळत नाही. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही आमची भावना असल्याचे त्यांनी बोलून दाखवली.

यावेळी बाळासाहेब होसिंग, अभय पुराणिक, राजेंद्र सूर्यपुजारी, पद्माकर सूर्यपुजारी, श्रीनिवास पुराणिक, सौरभ शास्त्री, राजकुमार बोरीकर, प्रशांत गंधे, निलेश गंधे, सुनील देशमुख, सारंग पुराणिक, शैलेश गंधे, रविराज पुराणिक, सागर पुराणिक, शुभम पुराणिक, अतुल देशपांडे, सुनील पुराणिक, अजय पुराणिक, अजित भनगे, प्रीतम दिवाण, प्रवीण गंधे, कृष्णा जगदाळे, आदित्य सूर्यपुजारी, बालाजी पुराणिक, ऋषिकेश सूर्यपुजारी आदींनी सदर निवेदना व सह्या केल्या आहेत.