कौटुंबिक वादातुन विवाहीतेची आत्महत्या ; पोलिसात गुन्हा दाखल
करमाळा समाचार

कौटुंबिक वादातून विवाहितेने टोकाचे पाऊल उचलत लहानग्या मुलांना मागे ठेवून स्वतःचे आयुष्य संपवण्याची घटना राजुरी तालुका करमाळा येथे घडले आहे. याप्रकरणी करमाळा पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. तर मुलीच्या माहेरच्या मंडळींकडून राग व्यक्त करत महिलेचा अंत्यविधी राजुरी येथे पार पाडला. सदर घटनेचा पुढील तपास करमाळा पोलीस करत आहे.

सौ.प्रियंका उर्फ जागृती दशरथ साखरे असे मयत विवाहितेचे नाव आहे. हिने काल घराजवळील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली आहे. कौटुबिक वादातून आत्महत्या केल्याची माहिती समोर येत आहे. त्यांच्या मागे एक मुलगा, एक मुलगी, पती,सासू, सासरे असा परिवार आहे.
राजुरी येथे साखरे कुटुंबीय बागायतदार कुटुंबीय म्हणून ओळखले जातात. हसत्या खेळत्या घरात सुनेच्या वेदना सासरची मंडळी समजू शकली नाहीत अशी परिस्थिती दिसून येत आहे. दोन लहान मुलांना सोडून जाताना त्या आईच्या वेदना कुठपर्यंत टोकाला जाऊन पोहोचले असतील याचं अंदाज मिळून येत नसला तरी नुकताच झालेला वाद हा किरकोळ स्वरूपाचा होता अशा चर्चा आहेत. मात्र एवढे टोकाचे पाऊल उचलले त्यामागील नेमके काय कारण असू शकते याचा अंदाज बांधता येत नाही. घटना दुर्दैवी आहे अशा घटना टाळण्यासाठी मुलींनीही आपल्या माहेरच्या मंडळीला सर्व गोष्टीची कल्पना देणे गरजेचे आहे. तर माहेरच्यांनीही मुलींना तेवढी मोकळीक देत बाजू ऐकून घेतली पाहिजे व मुलींच्या पाठिशी उभा राहिले पाहिजे.


