करमाळाक्राईमसोलापूर जिल्हासोलापूर शहर

आणखी सात लाख गेले असते चोरीला पण वाचले ; उपाययोजना राबवल्यास चोरी अशक्य

करमाळा समाचार

गॅस कटरच्या सह्हाय्याने शहरालगत असलेल्या एटीएम फोडुन तेरा लाख रुपयांची रक्कम चोरुन नेल्याची घटना घडली आहे. सदर प्रकरणात बॅंकेने एटीएमला सुरक्षा रक्षक न ठेवल्याने बॅंकेला मोठे नुकसान सहन करावे लागले आहे. सुदैवाने आलार्म वाजल्याने शेजारी असलेल्या डिपॉझीट मशीन मधील तब्बल सात लाखाची रक्कम मात्र वाचली आहे. सदरची घटना रविवारी पहाटे पाच च्या सुमारास आयडीबीआय बॅंकेशेजारीच असलेल्या एटीएम मध्ये घडली आहे.

याप्रकरणी करमाळा पोलीस ठाण्यात आणण्यात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर बँकेचे व्यवस्थापक अमोल घाडगे रा. अरण ता. माढा जिल्हा सोलापूर यांनी फिर्यादी दिले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, आयडीबीआय बँकेच्या एटीएम मध्ये रोज दहा ते बारा लाख रुपये जमा केलेले असतात. तर सुट्टी असल्याने बँकेत जास्तीचा म्हणजेच २१ लाख रुपयांचा भरणा करण्यात आला होता. परंतु दिवसभरात आणि ट्रांजेक्शन झाल्यामुळे एटीएम मधून बरीचशी रक्कम काढण्यात आली होती. तरी देखील त्यामध्ये १३ लाख ६४ हजार रक्कम शिल्लक राहिली होती.

आयडीबीआय बँक देवीचामाळ रस्त्याला असून हा रस्त्यावर रहदारीचा रस्ता आहे. परिसरात बरेचसे लोक पहाटे उठून फिरण्यासाठी जात असतात. पहाटे साडेचार च्या सुमारास अचानक एक चार चाकी गाडी बँकेसमोर येऊन उभा राहिली. समोर असलेल्या हॉटेलमधील कर्मचाऱ्यांनी ती पाहिली पण कोण तरी ग्राहक असेल म्हणून दुर्लक्ष केले. थोड्याच वेळात तिथून धूर येऊ लागला. त्यानंतर तिथे काहीतरी झाल्याचे त्याच्या लक्षात आले. सदरच्या चोरट्यांनी एटीएममध्ये प्रवेश करून सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर पांढरा रंगाचा स्प्रे मारला व गॅस कटरच्या साह्याने एटीएम उभे फोडून त्यामधील तेरा लाखाची रक्कम घेऊन पळून गेले. यावेळी कट्टर च्या साह्याने कापत असल्याने एटीएम च्या रूममध्ये धुर झाला व त्यावर आलार्म वाजणाऱ्या मशीन वर धूर गेल्यामुळे बँकेतील आलार्म वाजू लागला. त्यामुळे त्या आवाजाला घाबरून चोरटे सर्व सामान घेऊन पळून गेले. सर्व प्रकाराबद्दल पोलिसांना माहिती दिल्यानंतर घटनास्थळी पोलीस निरीक्षक ज्योतिराम गुंजवटे, सहाय्यक पोलीस निरीक्षक नेताजी बंडगर व पथक पोहोचले व पुढील कार्यवाही सुरू आहे. घटनेचा पुढील तपास बंडगर हे करीत आहेत.

चोरटे सराईत गुन्हेगार..
सदरची बँक ही शहरापासून लगत असलेल्या अंतरावर नव्या वस्ती शेजारी आहे. त्या परिसरातील बरेचसे लोक सकाळी भेटण्यासाठी जातात. त्यामुळे पहाटे साडेचार वाजल्यापासून त्या रस्त्यावर रहदारी चालू होते. पण चोरटे अचानक आले. मोठी गाडी एटीएम बाहेर उभा केली व आज प्रवेश करताना व आत मधील कॅमेऱ्यावर स्प्रे मारला व अवघ्या दहा मिनिटात सदर मशीन फोडून आतली रक्कम घेऊन पळून गेले. यावरून सदरचे चोरटे हे सराईत असल्याचे लक्षात येत आहे. तर ते परप्रांतीय असल्याची माहीती मिळत आहे. पण ते आत्ताच बोलणे घाईचे ठरेल.

सुरक्षा रक्षक असल्यास धोका टळू शकेल…
बँकांनी दहा ते बारा लाख रुपयांची मोठी रक्कम एटीएम मध्ये ठेवत असतात. पण त्या रकमेला रक्षण करण्यासाठी सुरक्षा रक्षक नेमत नाहीत. त्यामुळे त्याचा तोटा अशा पद्धतीने सहन करावा लागतो. मुळातच मोठ्या खोलीमध्ये एटीएम ठेवण्यापेक्षा केवळ हात पोहोचेल अशा अंतरावर एटीएम व सुरक्षा भिंत असलेले कवच असेल तर अशा चोरां पासून वाचाता येऊ शकते. पूर्ण खोलीत आत मध्ये जाऊन चोरटे काय करतात हे बाहेर थांबून समजू शकत नाही त्यामुळे असे धोके वाढले आहेत.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE