मकाई निवडणुक – कोळगाव येथील सभासद उद्या ताकदीने बागल गटाला विजयी करणार – शिंदे
करमाळा समाचार
मकाई सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी उद्या मतदान होत असताना कोळगाव ग्रामस्थांनी मकाई निवडणुकीवर बहिष्कार टाकल्या बाबत खोटी माहिती पसरवली जात आहे. मी वैयक्तिक मकाईचा सभासद असून बागल गटाचे सर्व कार्यकर्ते व कोळगाव सभासदांना दिलेले उमेदवार मान्य असल्याने आम्ही उद्या मतदान करणार आहोत अशी माहिती कोळगाव चे बागल गटाचे जुने खंदे समर्थक मकाईचे सभासद अनिल शिंदे यांनी दिले आहे. तर बागल गटाचा एकतर्फी विजय दिसू लागल्याने सदरचे प्रकार सुरू असल्याचे दिसत आहे असेही ते म्हणाले.

मकाई सहकारी साखर कारखान्याची बागल गटाने कार्यकर्त्यांना तसेच सभासदांना विश्वासात घेऊन सर्व उमेदवार दिले आहेत. ते आम्हाला मान्य आहेत. त्यानुसार आम्ही त्यांच्या विजयासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. उद्या मोठ्या संख्येने बागल गटाचे सर्व कार्यकर्ते हे मतदान करणार असून बहिष्कार वगैरेच्या खोट्या अफवा पसरून मतदारांना त्यापासून परावर्तीत करण्याचे काम केले जात आहे. त्यामुळे या अफवांकडे कोणीही लक्ष देऊ नये. कोळगाव सभासद हे मतदान प्रक्रियेत सहभागी होऊन बागल गटाचा झेंडा होणार आहेत अशी माहिती शिंदे यांनी दिली आहे.
