करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

अविरोध निवडणुकीनंतर नव्या अध्यायाला सुरुवात ; दोन्ही नेत्यांनी घेतली भेट

करमाळा समाचार

करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक नुकतीच पार पडली. यामध्ये तीनही गट एकत्र आल्यामुळे सदरची निवडणूक ही अविरोध पार पडल्यामुळे तिन्ही गटात आनंदाचे वातावरण आहे. सत्ता मिळवण्यापेक्षा तीनही गटातील कडवा विरोध मावळला हे महत्त्वाचे असल्याचे यातून दिसून येत आहे. तर आता नव्याने माजी आमदार नारायण पाटील व जयवंतराव जगताप यांच्या मैत्रीचा नवा अध्याय सुरू होताना दिसत आहे. नुकतेच पाटील यांनी भेट घेतली. त्यावेळी दोघांनीही एकमेकांचा सत्कार केला.

मागील निवडणुकीमध्ये माजी आमदार जयवंतराव जगताप व माजी आमदार नारायण पाटील यांनी एकत्रित कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक लढवली होती. त्यानंतर पाटील गटाचे समर्थक असलेले शिवाजीराव बंडगर यांनी बंडखोरी करत बागल गटाशी हात मिळवली केली होती. यानंतर बरेच वादही झाले. पण सर्व प्रकारात माजी आमदार नारायण पाटील यांचे निकटवर्ती असलेले बंडगर बंडखोरी करून गेल्यामुळे पाटील यांच्यावर जगताप यांचा रोष होणे साहजिक होते. परंतु आज तागायत पाटील यांनी बंडगर यांना कधीही जवळ केले नाही उलट ते मागेही बंडगर यांच्या विरोधात भूमिका घेताना दिसले होते.

या निवडणुकीच्या माध्यमातून पुन्हा एकदा दोन्ही नेत्यांच्या मध्ये असलेला दुरावा कमी झालेला दिसून येत आहे. याचा फायदा नक्कीच तालुक्याच्या विकासाला झाल्याशिवाय राहणार नाही. विधानसभेच्या दरम्यान जरी माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी संजय मामा शिंदे यांना सहकार्य केले असले तरी स्वतः नारायण पाटील यांनी कधीही जगताप यांच्या विरोधी भूमिका बोलून दाखवली नाही. त्याचाच यावेळच्या निवडणुकीत एकत्र येण्यासाठी फायदा झालेला दिसून येत आहे. आज सत्कार झाला यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे, तालुकाप्रमुख देवानंद बागल, एडवोकेट कमलाकर वीर यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE