जेऊर येथे जिनियस अबॅकस सेंटर मधील गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा संपन्न
जेऊर/प्रतिनिधि
प्रोअॅक्टिव समर नॅशनल स्पर्धेत करमाळा तालुक्यातील जेऊर येथील जिनियस अबॅकस सेंटर मधील 21 विद्यार्थ्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर घवघवीत यश मिळविल्यामुळे सर्व विद्यार्थ्यांचे शिक्षक व पालक वर्गातून कौतुक होत आहे या २१ गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा मंगळवार दिनांक २१-९-२०२१ रोजी संपन्न झाला. कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांचे पलक बलदोटा व स्वरा निर्मळ यांनी गणेश वंदनाने स्वागत केले . मान्यवरांच्या हस्ते सरस्वतीपूजन व दीप प्रज्वलन करुन कार्यक्रमास सुरुवात झाली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी यश कल्याणी ग्रामीण सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. गणेशभाऊ करे- पाटील प्रमुख पाहुणे दत्तकला शिक्षण संस्थेच्या सचिव सौ मायाताई झोळ, सौ वर्षा करंजकर बालरोग तज्ञ, सौ.ज्योतीताई पाटील सामाजिक कार्यकर्त्या तसेच सौ राजकुवर पाटील मॅडम ,भारत हायस्कूल जेऊरचे प्राचार्य मा.श्री केशव दहिभाते, भारत प्रायमरी स्कूलचे मुख्याध्यापक मा श्री दीपक व्यवहारे ,योद्धा करिअर ॲकॅडमीचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री नवनाथ नाईकनवरे आदी मान्यवर उपस्थित होते.
कोविड संबंधीचे सर्व नियमाचे पालन करुन मान्यवरांच्या हस्ते सर्व गुणवंत विद्यार्थांना सन्मानपत्र व ट्रॉफी देण्यात आली . कु .स्वरा निर्मळ, कु .सृजन घाडगे, कु .मुग्धा डांगे, कु .अनुष्का जाधव, आयुष जाधव, कु .आदिती कानगुडे, कु साक्षी माळवे, कु .निऋती हेळकर या विद्यार्थ्यांची महाराष्ट्रात निवड झाली आहे. त्याचप्रमाणे पलक बलदोटा , गिरिषा मुथा, सई नलवडे, नंदिनी कानगुडे, तन्मय सरडे , शौनक दुधाळ ,मधुरा डांगे, रीधा फकीर ,नमन दोशी ,वेदांती निमगिरे ,रिहान शेख ,चैत्राली मंडलेचा, अतिथी मुंगूसकर या विद्यार्थ्यांनीही यश संपादन केले आहे.अशा गुणवंत विद्यार्थ्यांच्या पाठीशी कायम राहून मुलांना कौतुकाची थाप म्हणून यशकल्यानी ग्रामीण सेवाभावी संस्थेतर्फे या सर्व गुणवंत विद्यार्थाचा सत्कार करण्याचे मा .श्री. गणेश करे- पाटील यांनी घोषित केले आहे.

सदर जीनियस प्रोऍक्टिव्ह च्या संचालिका यांनाही या यशाबददल प्रोऍक्टिव्ह कंपनीकडून बेस्ट परफॉर्मन्स अवॉर्ड म्हणून सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले .या कार्यक्रमात विद्यार्थी व पालकांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच जिनीयस अबॅकस क्लासच्या विद्यार्थ्यांनी अबॅकसचा डेमो सादर करून दाखविला . कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. श्री. गणेश करे- पाटील यांनी विद्यार्थी व पालकांना मोलाचे मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव दिला पाहिजे . आपला विद्यार्थी घडला तर पुढे भविष्यात तो स्वतःचे करिअर करू शकतो .असा संदेश त्यांनी आपला भाषणातून दिला.
या कार्यक्रमासाठी पालक, विद्यार्थी तसेच जेऊर ग्रामस्थ उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन मा .श्री. नितीन पाटील सर यांनी केले व जिनियस सेंटरच्या संचालिका कु. अंकिता वेदपाठक यांनी मान्यवर आणि उपस्थित ग्रामस्थांचे आभार मानले.