जेष्ठ नेते शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन
करमाळा समाचार
आई सेवाभावी संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने लोकनेते माननीय श्री शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे.
दिनांक 12 /12 /2021 रोजी माननीय लोकनेते जाणता राजा शरद चंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त निमित्त आई सेवाभावी संस्थेतर्फे करमाळा तालुक्यातील टाकळी( रा )येथे सकाळी 10 वाजल्यापासून टाकळी चौकातील बारामती अँग्रो गट ऑफिस येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी एक वाजेपर्यंत 55 नागरिकांनी रक्तदान केले आहे.


आई सेवा भाविक संस्थेचे हे दुसरे वर्ष असून बारामती ॲग्रो कारखान्याचे उपाध्यक्ष माननीय सुभाष (आबा) गुळवे यांनी सर्वप्रथम रक्तदान करून युवा कार्यकर्त्यांना तसेच ऊस वाहतूक संघटना तसेच शेतकरी वर्गाला रक्तदानाचे महत्त्व पटवून देऊन जास्तीत जास्त नागरिकांनी रक्तदान करण्याचे आवाहन केले आहे. यावेळी किरण कवडे आजिनाथ सहकारी साखर कारखाना संचालक, सुहास गलांडे, प्रगतशील बागायतदार कोंढार चिंचोली, राजेंद्र धांडे माजी संचालक आजीनाथ कारखाना, राजेंद्र रणसिंग साहेब डीसीसी बँक टाकळी शाखा , डॉक्टर गोरख गुळवे ,पैलवान धनंजय(दादा) गोडसे, सुनील गोडसे माजी उपसरपंच टाकळी, भारत कोकरे सरपंच लतीश लकडे पाटील मा़, को , चिंचोली ,सो ,चेरमण यांनी रक्तदान करून आपला सहभाग नोंदवला.
तसेच या रक्तदान शिबिरासाठी बारामती या ॲग्रोचे बनगर साहेब शेतकी अधिकारी ,तसेच संदीप चाकणे, उप शेतकी अधिकारी, रमेश बागनवर उप शेतकी अधिकारी , हरिभाऊ गुळवे , पवार चीट बॉय जिंती गट व इतर बारामती ऍग्रो स्टाफ व टाकळी ग्रामस्थ यांनी परिश्रम घेत आहेत.