संचालक निवडीचे पत्र देताना अचानक मंत्री सावंत संतापले ; माझ्यासोबत असला राडा घालायचा नाही म्हणत दिला इशारा
करमाळा समाचार
आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या प्रशासक निवडीचे पत्र आज आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या हस्ते देण्यात आले. सदरचे पत्र हे सोनारी येथे देताना तालुक्यातील मान्यवर उपस्थित होते. त्यामध्ये शिंदे यांच्या कारखान्याचे माजी कार्यकारी संचालक हरिदास डांगे उपस्थित होते. त्यावेळी त्यांच्या उपस्थितीवरून मंत्री तानाजी सावंत हे चांगले संतापल्याची दिसून आले. “मीही त्याच मातीतला असून असला राडा आमच्याशी खेळायचा नाही” असा इशाराही यावेळी त्यांनी दिला आहे. घटनेचा विडिओ सध्या सोशल मिडियात व्हायरल झाल्यानंतर उलटसुलट चर्चा सुरु आहेत.

आदिनाथ सहकारी साखर कारखाना अडचणीत असताना मंत्री तानाजी सावंत यांच्या सहकार्याने व आर्थिक मदतीमुळे आदिनाथ सुरू करण्यासाठी भरपूर सहकार्य झाले होते. त्याच्यानंतर त्यावर प्रशासक नेमण्यात आले. नेमण्यात आलेले प्रशासक ही सावंत यांच्या मर्जीने आल्याचे बोलले जात होते. त्याचाच प्रत्यय ज्यावेळी त्या ठिकाणी संचालक मंडळ नेमण्याची नियोजन सुरू होते. त्यामध्ये सावंत यांच्या नजीकचे शिवसेना जिल्हाध्यक्ष महेश चिवटे यांची वर्णी लागली. त्यावेळी या संपूर्ण नियोजनात त्यांची भूमिका असल्याचे दिसून आले.

तरीही आज ज्यावेळी कमलाई शुगर फॅक्टरी चे माजी कार्यकारी संचालक हरिदास डांगे ज्यावेळी पत्र स्वीकारताना चिवटे यांच्या बाजूला उभे राहत होते. त्यावेळेस मंत्री सावंत यांचा पारा चढला व त्यांनी जागीच खडे बोल सुनावले. यावेळी चिवटे यांनी डांगे यांनी कमलाईचा राजीनामा दिला असल्याचे सांगत त्या ठिकाणी परिस्थिती सावरण्याचा प्रयत्न केला. परंतु तानाजी सावंत हे वेगळ्याच मूडमध्ये दिसू लागले होते. अखेर पत्र देण्याचा कार्यक्रम पूर्ण करण्यात आला.