करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

गोवंश घेऊन जाणाऱ्या गाडीची तिघांना धडक ; तिघे जखमी तर एका गाईचा मृत्यू

करमाळा समाचार

गोवंश घेऊन जाणाऱ्या पिकअप गाडीच्या अपघातात देवाची ज्योत घेऊन जाणारे तीघे जखमी तर एका मोटरसायकलचे नुकसान झाले आहे तसेच कत्तलीसाठी घेऊन जात असलेल्या एका गाईचा मृत्यु व चार जखमी झाल्या प्रकरणी दोघांवर करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरचा प्रकार १६ एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास कंदर परिसरात घडला आहे.

महेबुब सैफन शेख रा. घडगेवाडी,निरवागज जिल्हा पुणे व समीर सैफन शेख रा. मेखळी, ता. बारामती असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पोलिस नाईक प्रमोद गवळी यांनी फिर्याद दिली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, दिनांक १६ एप्रिल रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास कंदर ता. करमाळा गावच्या शिवारात करमाळा ते टेंभुर्णी रोडवर सांगवी फाटा येथे आर एस गोल्ड स्टोरेज च्या समोर पांढऱ्या रंगाच्या महिंद्रा पिकअप गाडी क्रमांक एम एच ४२ एम ८०८५ चा चालक महबूब सैफन शेख व मालक समीर शेख यांनी त्यांच्या ताब्यातील गाडी रोडच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून घाईने व भरधाव वेगात चालवत असताना देवाची ज्योत घेऊन जाणाऱ्या अनिल पवार (वय ४०), संतोष पवार (वय ४५), दादासाहेब इरकर (वय ४२) सर्व रा. तालुका जामखेड जिल्हा अहमदनगर यांना धडक देऊन जखमी केले व तेथून पळ काढला. तसेच यावेळी शेजारी असलेल्या स्प्लेंडर मोटरसायकल क्रमांक एम एच १६ बी. एन. ०२८ या वाहनाचे हे नुकसान केले आहे.

सदर पिकअप गाडीमध्ये पाच जर्सी गाई कोंबून बांधून त्यांना निर्दयी वागणूक देऊन जनावरांची चारापाण्याची सोय न करता त्यांना घेऊन जात असताना हा अपघात घडला. यावेळी या अपघातात एक जर्सी गाईचा मृत्यू झाला आहे. तर चार जखमी अशा सर्व जखमी व मयत अपघातास जबाबदार म्हणून दोघांवर विविध कलम आधारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर घटनेचा पुढील तपास हवालदार ज्योतिराम बाळसराफ हे करीत आहेत.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE