खोटी माहीती देऊन पोलिसांची दिशाभुल ; देवीचामाळ येथील युवकावर गुन्हा दाखल
समाचार टीम
तुम्ही कोल्हा आला रे कोल्हा आला अशी एक गोष्ट ऐकली असेल. त्याचा मोबदला त्याला आपल्या सर्व मेंढ्या गमावून द्यावा लागला होता अशीच काहीच एक घटना करमाळा तालुक्यात घडली आहे. पण आता आधुनिक काळात गमतीसाठी पोलिसांना चकवायला गेला व स्वतःवर गुन्हा दाखल करुन घेतला आहे.

जनतेच्या सुरक्षिततेसाठी व नागरिकांना तात्काळ सेवा मिळावी या उद्देशाने पोलिसांनी 112 क्रमांक दिला आहे. यावर तात्काळ मदत पुरवली जाते. त्यामुळे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात येते. पण या संपर्क क्रमांकावर गंमत म्हणून एका युवकाला चांगलेच महागात पडले आहे.

देवीचामाळ तालुका करमाळा येथील रोहन दिलीप सोरटे याने 112 क्रमांकावर फोन लावून धायखिंडी तालुका करमाळा येथे खून झाल्याची माहिती 112 क्रमांकाला दिली. त्यानंतर पोलीस खात्याकडून सदर यंत्रणा वेगात हालचाल करीत राबवण्यात आली व दाहिखिंडी येथे जाऊन चौकशी केली असता असा कोणताच प्रकार घडला नसल्याचे निष्पन्न झाले.
त्यानंतर पोलिसांना खोटी माहिती देऊन पोलिसांनी दिलेल्या सुविधांचा गैरवापर केल्याबाबत त्याच्या विरोधात करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच यातील खोटी माहिती दिल्याबद्दल त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आले आहे. याबाबत बोलताना पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी सांगितले की, पोलीस यंत्रणेचा वापर यापुढे केल्यास कठोर कारवाई करण्यात येईल. सदर यंत्रेंणेचा कोणीही गैरवापर करू नये असे आवाहन यावेळी कोकणे यांनी केले आहे.