रखडलेल्या कामासाठी मनसेचे तालुकाध्यक्ष घोलप जलसंपदा मंत्र्याच्या भेटीला
करमाळा समाचार
करमाळा तालुक्यातील दहिगाव उपसा सिंचन योजनेतील रखडलेली कामे त्वरित पूर्ण करावीत यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संजय बापू घोलप यांनी पाठपुरावा सुरू केल्यानंतर आता त्यांनी ही मागणी मंत्रालयात जलसंपदामंत्री जयंत पाटील यांची भेट घेऊन बोलून दाखवले आहे.

यावेळी दिलेल्या निवेदनात, करमाळा तालुका नेहमीच अवर्षण व दुष्काळी परिस्थिती असणारा तालुका म्हणून ओळखला जातो. तालुक्यातील पश्चिम भाग सोडला तर बाकीच्या 70 टक्के भाग नेहमीच दुष्काळी भागाचा तीव्रतेने सामना करत आहे. त्यासाठी उर्वरित भागासाठी मुख्य:त्वे पूर्व भागातील जवळपास 24 ते 25 गावासाठी दहिगाव उपसा सिंचन योजना तयार करण्यात आली आहे.

गेली कित्येक वर्षे या योजनेवर राजकारणी आपली राजकीय पोळी भाजून घेत आहेत. पण काम अपूर्ण आहे. या योजनेअंतर्गत पाणी सोडले जाते मात्र त्याचा फायदा शेतकरी वर्गाला होताना दिसून येत नाही. काही ठिकाणी मुख्य चारी या अपूर्ण अवस्थेत तर उप चारी तर नाहीतच ही बाब लक्षात आणून देण्यासाठी आज घोलप यांनी अशा पद्धतीने निवेदन जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्याकडे सोपवली व लवकरच या कामासाठी मंजुरी द्यायला अशी अपेक्षा व्यक्त केली.