मोहोळ पोलिसांनी गाड्या चोराला ठोकल्या बेड्या ; तपास पथकात करमाळ्यातुन गेलेल्या साठेंचा समावेश
मोहोळ – प्रतिनिधी
सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुका पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या दुचाकी चोरीच्या प्रकरणात तपास करत असताना पोलिस ठाण्याच्या गुन्हे शाखेला भांबेवाडी तालुका मोहोळ येथे विना नंबरची गाडी असल्याची माहिती मिळाली. त्या ठिकाणी पाळत ठेवून गुन्हेशाखेच्या पथकाने विना नंबरची गाडी वापरणारा ताब्यात घेतला. त्याच्याकडून सात दुचाकी पोलिसांना मिळाल्या आहेत.

याबाबत पोलिसांनी कुंदन तुकाराम माने रा.भांबेवाडी याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहोळ शहर व तालुक्यात चोरीला गेलेल्या दुचाकी तपासात मोहोळ पोलिस ठाण्याचे गुन्हे शाखेचे शरद ढावरे, पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण साठे, पोलीस कॉन्स्टेबल गणेश दळवी यांच्या पथक तपास करत असताना त्यांना मोहोळ तालुक्यातील भांबेवाडी येथे वीना क्रमांकाची दुचाकी वापरत असल्याची माहिती मिळाली. गुन्हे शाखेच्या पथकाने माहीती नुसार गावात जाऊन पाहणी केल्यानंतर त्या ठिकाणी सदर कुंदन हा एका दुचाकीसह मिळुन आला.

त्याला जाब विचारल्यानंतर त्याची उडवाउडवीची उत्तरे आलेली पाहून पोलिसांचा संशय अधिकच बळावला व त्याला पोलिसांनी खाक्या दाखवताच संबंधित आरोपींनी गुन्ह्याची कबुली देत आपल्या पत्राशेड मध्ये आणखीन सहा गाड्या असल्याचे सांगितले. या आरोपीकडून तब्बल सात गाड्या पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत. त्या गाड्यांची नोद कुठे आहेत याची माहीती घेतली जात आहे.