करमाळासोलापूर जिल्हा

कारखाना बचाव संघर्ष समीतीच्या बैठकीत दिग्गजांची उपस्थिती ; भाडेतत्वावर देण्यास होतोय विरोध

प्रतिनिधी सुनिल भोसले

करमाळा विश्रामगृह येथे श्री आदिनाथ व मकाई सहकारी साखर कारखाने जिवंत राहिले पाहिजे यासाठी आदिनाथ व मकाई कारखाना बचाव संघर्ष समितीची बैठक संपन्न झाली. यावेळी अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. दोन्ही साखर कारखाने करमाळा तालुक्यातील ऊस उत्पादक म्हणून अग्रेसर आहेत. परंतु सभासदांनी मोठ्या विश्वासाने ‌निवडुन दिलेल्या मंडळींना चालवता आला नाही. त्याच्या बेजबाबदार पणामुळे कारखान्याचे वाटोळे झाले असे शहाजी देशमुख म्हणाले.

तात्यासाहेब मस्कर म्हणाले, आपण सभासदांना व ऊस उत्पादक शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन कोर्टात जाऊन दोन्ही कारखान्यातील संचालक मंडळ बरखास्त करून कारखान्याची चौकशी लावुन प्रशासन नेमलं पाहिजे.

यावेळी सवितादेवी राजेभोसले म्हणाले, तालुक्यातील दोन्ही कारखाने सभासदांचे व शेतकऱ्यांचे मंदिर मानले जाते. आतापर्यंत कारखान्यातील सत्तेत आसणाऱ्यांनी आपला स्वार्थ साधण्यासाठी कारखाना लुटण्याची भुमिका घेतली म्हणून सर्वांनी मिळून कारखाना वाचवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे.

शेवटी दशरथआण्णा कांबळे म्हणाले, ही माझ्या एखट्याची लढाई नसुन सभासद शेतकरी बांधव व आपल्या सर्वांची लढाई आहे, म्हणून न्यायालयीन लढाई बरोबर रस्त्यावरची लढाई सुध्दा केली पाहिजे. तरच दोन्ही साखर कारखाने वाचतील कारखाना उभारणीसाठी अनेकांनी जीवाचे रान करून सभासद गोळा करून कारखाना उभा केला. हा जर भाडेतत्त्वावर गेला तर येणाऱ्या काळात निवडणूका न होता कारखान्याचे खाजगीकरण झाल्याशिवाय राहणार नाही. बत्तीस हजार सभासद असुनही आपल सुज्ञ मंडळी कारखाना वाचवु शकत नसेल तर तालूक्याचे दुर्भाग्य आहे असे कांबळे म्हणाले.

यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरूद्ध कांबळे, शहाजीराव देशमुख, दशरथआण्णा कांबळे, जिल्हा परिषद सदस्या सवितादेवी राजेभोसले, तात्यासाहेब मस्कर, सुहास गलांडे, अजित तळेकर, नाना लकडे, डॉ अमोल घाडगे, बाळासाहेब जगदाळे, महेंद्र पाटील, डॉ पुंडे, उदयसिंह मोरे पाटील, नागनाथ लकडे, अमरजित साळुंखे, आबा टापरे, एॅड विकास जराडे, यांच्या सह शेतकरी बांधव उपस्थित होते.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE