सोमवारचा वायदा हवेड उडाला ; ठेकेदारासह अधिकाऱ्यांना पडला विसर
करमाळा समाचार
करमाळा गुळसडी रस्त्यावरील पांड ओढा या ठिकाणी अद्यापही कामाला सुरुवात झालेली नाही. पत्रकार व सामाजिक कार्यकर्त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना विचारल्यानंतर तात्पुरती वेळ घालवू उत्तरे दिली जातात. परंतु अद्यापही कामाला सुरुवात होत नसल्याने नेमके अधिकारी व संबंधित ठेकेदाराचे काय चालले आहे हा प्रश्न उपस्थित होत आहे. मागील वर्षभरापासुन मंजुरी असलेला पुल होत नसेल तर न काम करताच संपुर्ण पुल घशात घालण्याचा विचार आहे काय असा प्रश्न विचारला जात आहे.

करमाळा गुळसडी मार्गावर पांड ओढा येथे मोठ्या प्रमाणावर पाणी वाहून जात असल्याच्या तक्रारी गेल्यानंतर तात्पुरतं समाधान करण्यासाठी त्या ठिकाणी ठेकेदाराला सांगून पाईप आणून टाकण्यात आले. परंतु तब्बल एक महिना उलटला तरी अद्याप त्या ठिकाणी कोणतेही काम झालेले नसल्याचे दिसून आले नाही. नुसतेच लोकांच्या तोंडाला पाने पुसण्याची काम या ठिकाणी केले जात असल्याचे दिसून येत आहे. नुकतेच संबंधित अधिकाऱ्यांनी सोमवारी काम चालु होईल असे सांगितले होते पण काम अजुनही सुरु नाही.
सदरचा रस्ता हा शेलगाव, सौदे, सरपडोह, वरकटणे, भालवडी, निंभोरे, केम या गावाला जाणारा आहे. मागील दोन वर्षांपूर्वी एका परप्रांतीय व्यक्तीचा पाण्याचा अंदाज न आल्याने वाहुन गेला नंतर पाण्यात बुडून मृत्यू झाला होता. त्यानंतर सदर रस्त्याचे टेंडर काढण्यात आले. पण अद्यापही पुलाचे काम अर्धवटच असल्याने सध्या आणून टाकलेल्या पाईप व खडीमुळे उलट वाहतुकीचा खोळंबा झाला आहे. रस्त्याची रुंदी कमी झाली असून उंची ही कमीच आहे. यामुळे पुन्हा मोठा पाऊस झाल्यास धोका संभावतो.
