करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

लाखांपेक्षा जास्त मतमोजणी पुर्ण ; आता पर्यत मोहितेंची आघाडी

करमाळा समाचार

माढा लोकसभा मतदारसंघात आतापर्यंत एक लाखाच्या पुढे मतमोजणी पूर्ण झालेले आहे.यामध्ये आतापर्यंत धैर्यशील मोहिते पाटील यांना 9507 मतांचे मताधिक्य मिळताना दिसून येत आहे. त्यांना एकूण 61,116 मते मिळाली आहेत. तर रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना 51 हजार 609 मते मिळाले आहे.

सध्या माढा लोकसभा मतदारसंघाची मताधिक्य नंतर मोहिते पाटील गटाकडून जल्लोष साजरा केला जाऊ लागला आहे. पहिल्या फेरीपासून धैर्यशील मोहिते पाटील हे पुढे असल्याचे दिसून येत आहे. तर आतापर्यंत एक लाख 18 हजार मतांचे मतमोजणी झाल्याचे दिसून आले. यामध्ये धैर्यशील मोहिते पाटील, रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यानंतर वंचित बहुजन आघाडीला मते मिळतील अशी अपेक्षा होती. परंतु धक्कादायक असे न्यू राष्ट्रीय समाज पार्टीचे रामचंद्र घुटुकडे यांना 5685 मते मिळताना दिसत आहेत. तर बारस्कर रमेश यांना केवळ 2802 मते मिळाल्याचे दिसून आले.

politics

या लोकसभा निवडणुकीमध्ये करमाळा तालुक्यातील इतर दोन उमेदवारांनी नशीब आजमावलं होतं त्यामध्ये विनोद दिलीप सीतापुरे यांना आतापर्यंतच्या आकडेवारी मध्ये 112 मते मिळाले आहेत. तर अशोक दयानंद वाघमोडे यांना 97 मते मिळाले आहेत. मुख्य लढत ही रणजितसिंह नाईक निंबाळकर व धैर्यशील मोहिते पाटील यांच्यातच पाहायला मिळत आहे.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE