करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

कॉग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रताप जगताप शिंदेंच्या भेटीला ; करमाळ्यात मेळाव्याचे नियोजन

करमाळा समाचार

माजी केंद्रीय गृहमंत्री मा. सुशील कुमार शिंदे यांची आज सोलापूर येथे सदिच्छा भेट झाली. तालुक्यातील विविध घडामोडीवरती चर्चा होऊन लवकरच करमाळा या ठिकाणी काँग्रेस पक्षाचा जाहीर मेळावा आयोजित करण्यात येणार असल्याचे काँग्रेस आय पक्षाचे करमाळा तालुकाध्यक्ष प्रतापराव जगताप यांनी माननीय सुशील कुमार शिंदे साहेब यांना आश्वासित केले.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर करमाळा तालुक्यातील काँग्रेसने केलेल्या कामाबद्दल माहिती देत येणाऱ्या विधानसभा निवडणुका व इतर निवडणुका संदर्भात पुढील रणनीती आखण्यासाठी युवकांचे संघटन गरजेचे आहे. त्यामुळे काँग्रेसची विस्कटलेली घडी पुन्हा घालण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांना एकत्र आणले जाणार आहे. यावेळी माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे हे मार्गदर्शन करतील अशी माहिती प्रताप जगताप यांनी दिली.

politics
DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE