खासदार धैर्यशील मोहिते पाटील करणार करमाळा तालुक्यात जनसंवाद व आभार दौरा..
करमाळाः प्रतिनिधी
माढा लोकसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नुतन खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांना करमाळा तालुक्यातुन ४१,५११ मतांचे लीड मिळाले होते. त्याविषयी करमाळा तालुक्यातील मतदारांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी खा.मोहिते पाटील हे माजी आमदार नारायण आबा पाटील, जगताप गटाचे नेते वैभवराजे जगताप, शिवसेना, काँग्रेस व मित्रपक्षांचे नेतेमंडळी यांचेसह करमाळा तालुक्यात जनसंवाद व आभार दौरा करणार आहेत.

गुरुवार दिनांक २०/६/२०२४ रोजी वांगी जि.प गटातुन संवाद व आभार दौर्याला सुरवात होणार असुन जिल्हा परिषद नवीन गट रचनेनुसार गुरुवारी प्रत्येक जि.प गटात ते मतदार, कार्यकर्ते यांच्या भेटी घेणार असुन आभार व्यक्त करुन जनतेच्या अडीअडचणी समजुन घेत त्यावर मार्ग काढणार असल्याचे मोहिते पाटील यांच्या जनसंपर्क विभागाकडुन सांगितले आहे.
खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांचा करमाळा तालुका जनसंवाद व आभार दौरा पुढील प्रमाणे असणार आहे.

गुरुवार दि २०/०६/२०२४
१)वांगी नं१ -सकाळी ९ ते १० वा.ठिकाण- राम मंदिर(वांगी जि.प.गट), २)वाशिंबे – १०:३० ते ११:३० वा.ठिकाण – मेन चौक वाशिंबे(चिखलठाण जि.प गट) ३)जिंती – दुपारी १२ ते १ वा.(राखीव)ठिकाण – राजेभोसले वाडा (कोर्टी जि.प.गट),४)विट – दुपारी २ ते ३ वा.ठिकाण – रेवन्नाथ मंदिर(विट जि.प.गट), ५)करमाळा – दुपारी ३:३० ते ४:३० वा.ठिकाण – दत्त मंदिर(करमाळा शहर) ६)पोथरे – सायंकाळी ५ ते ६ वा.शनि मंदिरासमोर(पांडे जि.प गट) ७)केम – सायंकाळी ७ ते ८ वा.ठिकाण – विठ्ठल मंदिर केम (केम जि.प.गट)