करमाळ्यात ब्लड बॅंक झाल्याने रुग्णांच्या नातेवाईकांचे हेलपाटे वाचणार
समाचार टीम
करमाळा (प्रतिनिधी) खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन च्या वतीने करमाळ्यात श्री कमला भवानी ब्लड बँकेची सुरुवात झाली असून या ब्लड बँकेच्या माध्यमातून करमाळा तालुक्यात सह परिसरातील रुग्णांना मोठा दिलासा मिळेल असा आशावाद कमलाभवानी ब्लड बँकेचे कार्यकारी संचालक तथा शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे व संचालक दीपक पाटणे यांनी व्यक्त केला आहे.

करमाळा येथील देवीचा माळ रोडवरील अमरनाथ टावर मध्ये स्वातंत्र्य सैनिक कैलासवासी मनोहर पंत गणपत चिवटे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल च्या समन्वयातून ही ब्लड बँक सुरू करण्यात आली आहे.

या ब्लड बँकेच्या माध्यमातून करमाळा तालुका व परिसरात रक्तदान शिबिर मोठ्या प्रमाणावर आयोजन करण्यात येणार असून यामध्ये विविध सामाजिक संघटना गणेशोत्सव मंडळ विविध नेते मंडळींची वाढदिवस यानिमित्ताने रक्तदान शिबिरे घेणाऱ्या कार्यकर्त्यांनी समाजसेवकांनी ब्लड बँकेची संपर्क साधावा असे आव्हान या ब्लड बँकेचे व्यवस्थापक निलेश पाटील यांनी केले आहे.
जे रक्तदाते असतील किंवा जे रक्तदान शिबिर घेतील अशा मंडळांना मोफत व सवलतीच्या दरात रक्त देण्यात येणार आहे.
या ब्लड बँकेसाठी डॉक्टर कोमल सोरटे, प्रशांत भोसले, प्रशांत विधाते, साधू जगताप, ओंकार मिरगे आधी तज्ञ आपली सेवा देत आहेत.
आरोग्य मंत्री प्राध्यापक तानाजीराव सावंत व सोलापूर जिल्हा शिवसेना संपर्कप्रमुख शिवाजीराव सावंत यांच्या उपस्थितीत लवकरच या ब्लड बँकेचे लोकार्पण सोहळा होणार आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विशेष कार्यकारी अधिकारी तथा मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख मंगेश चिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली लवकरच करमाळ्यात डायलिसिस सेंटरची सुद्धा सुविधा उपलब्ध करून देणार असल्याची माहिती स्वातंत्र्यसैनिक मनोहरपंत चिवटे मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटलचे संचालक दीपक पाटणे यांनी दिली आहे.