करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

महाराष्ट्र का बिहार ; सावडीच्या महिला सदस्याचे अपहरण ?

करमाळा समाचार

तालुक्यातील सावडी ग्रामपंचायतीचे उपसरपंच महेंद्र एकाड यांच्यावर अविश्वास ठराव दाखल झाला होता. यामुळे प्रभारी तहसीलदार विजयकुमार यांच्या उपस्थितीत गुरुवारी (ता. ३) सकाळी ११ वाजता होणार होती पण आता सदरची कार्यवाही करण्यापुर्वी सिंधू ठोंबरे वय 65 यांचे अपहरण केल्याची माहिती समोर येत आहे. तसेच कोणताही सदस्य उपस्थित राहू न शकल्याने संबंधित कार्यवाही तहकूब केली जाऊ शकते.

यासंदर्भात ठोंबरे कुटुंबीयांनी करमाळा पोलीस ठाण्यात मिसिंगची नोंद केली आहे. तर पुढील तपास करून अपहरणाचा गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. त्यामध्ये किती जणांचे अपहरण झाले आहे हा पोलीस शोध घेत आहेत.

सावडी ग्रामपंचायतीत ११ सदस्य आहेत. त्यातील १० सदस्यांनी अविश्वास ठराव दाखल केला होता. उपसरपंच एकाड हे ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात घेत नाहीत, असा आरोप करण्यात आला आहे. या सभेसाठी महादेव येदवते, सागर भराटे, मारुती तळेकर, पूनम ठेंबे, कोमल एकाड, सिंधबाई ठोबरे, कोमल जाधव, रामचंद्र शेलार, शैला जाधव, शशिकला शेळके व महेंद्र एकाड असे सदस्य उपस्थित राहणे अपेक्षीत होते.

ठोंबरे कुटुंबीयांनी संबंधितावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणात सिंधू ठोंबरे यांचे काल सकाळी 11 वाजता अपहरण करून त्यांना सध्या कुठे ठेवले आहे हे अद्याप कळू शकले नाही. त्यामुळे कुटुंबीय चिंतेत आहेत. तर राजकारण आता इतक्या खालच्या पातळीवर जाऊन बसले आहे की महाराष्ट्र आहे का बिहार अशी परिस्थिती सध्या उपस्थित झाली आहे.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE