श्री. राजेश्वर विद्यालय राजुरी थ्रो बॉल संघ जिल्हास्तरीय विजेता
करमाळा समाचार
मंगळवार दि २२ क्रीडा व युवक सेवा संचलनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत व जिल्हा क्रीडा अधिकारी सोलापूर आयोजीत शालेय थ्रो बॉल क्रीडा स्पर्धा सिंहगड पब्लिक स्कूल केगाव सोलापूर येथे पार पडल्या. सदर स्पर्धेमध्ये सोलापूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांनी सहभाग नोंदवला होता. करमाळा तालुक्याचे प्रतिनिधित्व करत अंतिम सामन्यात राजुरीच्या १४ वर्ष वयोगटातील संघाने अक्कलकोट संघास पराभव करत अंतिम सामना जिंकला. विजेते पदावर आपले नाव नोंदवले.


तसेच श्री. राजेश्वर विद्यालय राजुरी प्रशालेच्या १७ वर्ष वयोगटातील संघ अंतिम सामन्यात अक्कलकोट संघाकडून पराभव पत्करावा लागला व सदर स्पर्धेत श्री. राजेश्वर विद्यालय राजुरी शाळेच्या १७ वर्ष वयोगटातील खेळाडूचां संघ उपविजयी झाला.
थ्रो बॉल संघातील खेळाडूंना श्री.मारुती संदिपान साखरे, राष्ट्रीय खेळाडू विठ्ठल सरोदे (सोलापूर) व संतोष पाटील (अक्कलकोट) यांचे मार्गदर्शन लाभले.
विजयी खेळाडूंचे वैजनाथ स्वामी सेवा मंडळाचे संस्थापक सचिव श्री. लालासाहेब गोविंद जगताप सर, प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. अनिल सोपान झोळ, जिल्हा क्रीडा अधिकरी मा. गणेश पवार, जिल्हा थ्रो बॉल अशोसिएशनचे सचिव मा. संतोष खेंडे व प्रशालेच्या शिक्षक वृंद,शिक्षकेतर कर्मचारी व राजुरी ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले.