सौ सत्यभामाबाई पारेकर पाटील यांचे निधन
करमाळा समाचार
तालुक्यातील पांगरे येथील सत्यभामा बाई बाबुराव पारेकर वय 85 यांचे आज रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात चार मुले, एक मुलगी, सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्या माजी सैनिक तसेच पांगरे येथील माजी सरपंच रामराव बाबुराव पारेकर यांच्या तर पोलीस निरीक्षक दिलीप कुमार पारेकर यांच्या मातोश्री होत्या.


तर राष्ट्रीय समाज पक्षाचे सोलापूर जिल्हा युवक अध्यक्ष नितीन पारेकर यांच्या त्या आजी होत. त्यांच्यावर पांगरे तालुका करमाळा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच निकटवर्तीय नातेवाईक उपस्थित होते.