करमाळासोलापूर जिल्हा

राजकीय नेत्यांचे जनतेसाठी दरवाजे बंद होते, परंतु महाराष्ट्रातील एकमेव राजसाहेब ठाकरे यांच्या घराचा दरवाजा जनतेसाठी सदैव उघडे

करमाळा समाचार 

आज करमाळा येथील गुरु प्रसाद मंगल कार्यालय येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा तालुकास्तरीय मेळावा संपन्न झाला. या मेळाव्याला जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी हजेरी लावली होती. त्याचप्रमाणे या मेळाव्याचे प्रमुख मार्गदर्शक जिल्हाध्यक्ष प्रशांत गिड्डे व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते दिलीप बापू धोत्रे हे होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून उपस्थित मान्यवरांचा यावेळेस सत्कार करण्यात आला.

यावेळेस दिलीप बापू धोत्रे यांनी उपस्थितांना संबोधित करताना सांगितले की, कोरोना काळात देशाचे प्रधानमंत्री मीडियासमोर कधी आले नाहीत तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी घराच्या बाहेर पाऊल टाकले नाही परंतु जनतेला से वार्‍यावर सोडणे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला कधी जमलेच नाही त्यामुळे मनसेचे सैनिक जीवावर उदार होऊन लोक सेवेसाठी घराबाहेर पडले व कोरूना काळात औषध अन्नपाणी तसेच हॉस्पिटल्स उपलब्ध करून देणे गरीब व गरजू रुग्णांना आर्थिक मदत ही करण्यात आलेली आहे आणि अशा वेळेस मनसेने कधीही राजकारणाचा भाग न घेता फक्त आणि फक्त समाजकारण केले ज्या वेळेस सर्व राजकीय नेत्यांचे जनतेसाठी दरवाजे बंद होते परंतु महाराष्ट्रातील एकमेव राजसाहेब ठाकरे यांच्या घराचा दरवाजा जनतेसाठी सदैव उघडा राहिला व अद्यापि जनतेच्या सेवेसाठी खुला आहे त्यामुळे कोरोना काळात कुणी घरात बसून आणि कोणी रस्त्यावर उतरून जनतेची सेवा केले अशा लोकांना जनता चांगलीच ओळखून आहे आणि त्याचा परिणाम येणाऱ्या निवडणुकांमध्ये जनता ह्या मस्तवाल पक्षाना दाखवुन दिल्या शिवाय राहणार नाही. असे उपस्थित पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना सांगितले.

 

 

कार्यकर्ते व पदाधिकारी यांना मार्गदर्शन करताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे, करमाळा तालुका अध्यक्ष संजय बापू घोलप यांनी बोलताना सांगितले की, आज पर्यंत मनसेने विविध विकासकामे जी तालुक्यामध्ये रखडली होती. अशी लोकहिताची कामे मस्तवाल राहणाऱ्या व जनतेला शुल्लक समजणाऱ्या अधिकाऱ्यांकडून वेळोवेळी आंदोलनाचे इशारे देऊन, अशी कामे करून घेतली आहेत. तरी कोरोना काळात नागरिकांच्या समस्येसाठी व प्रत्येक प्रश्नासाठी प्रत्येक वेळी मनसेने मोठ्या प्रमाणात पुढाकार घेतलेला आहे. पोलीस प्रशासन, नगरपालिका तसेच विविध अधिकाऱ्यांकडून कोरोना काळात जनसामान्यांना मोठ्या प्रमाणात त्रास झालेला आहे. व अशा वेळेस सर्वसामान्य नागरिकांची आशा म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेना जनतेच्या कसोटीवर खरी उतरलेली आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकांमध्ये मनसे जादूई करिष्मा दाखविल्याशिवाय राहणार नाही. अशा प्रकारचे आश्वासन उपस्थित वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना यावेळेस संजय घोलप यांनी दिले.

 

या मेळाव्यासाठी आप्पासाहेब कर्चे- (माढा लोकसभा अध्यक्ष), विजय रोकडे- (महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना), संपर्कप्रमुख सोलापूर राजेंद्र मोरे- (जिल्हा उपाध्यक्ष सोलापूर), बाळासाहेब टोणपे- (जिल्हा उपाध्यक्ष सोलापूर), सतीश फंड- (महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष पंढरपूर विभाग), आनंद मोरे- (मनविसे जिल्हा उपाध्यक्ष), सागर लोकरे- (माढा तालुका अध्यक्ष), अमोल घोडके- (शहर संघटक कुर्डवाडी), राहुल सुर्वे- (मनविसे तालुका अध्यक्ष माढा), युवराज कोळी- (मनविसे शहराध्यक्ष कुर्डूवाडी) इ. पदाधिकारी उपस्थित होते.

 

*BREAKING NEWS – अखेर मनोहर भोसलेंना आंतरिम जामीन मंजुर*
https://karmalasamachar.com/breaking-news-manohar-bhosale-finally-granted-interim-bail/

तर या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी .या वेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे . जि.उपाध्यक्ष राजेंद्र मोरे,ता उपाध्यक्ष, अशोक गोफणे,ता.उपाध्यक्ष मा.राजाभाऊ बागल ,शहर अध्यक्ष नानासाहेब मोरे, जि.म.न.वि से संपर्क अध्यक्ष मा. विजय रोकडे, करमाळा ता.संपर्क अध्यक्ष मा.रामभाऊ जगताप, म.न.वि.से.जि.अध्यक्ष मा.सतिश फंड,जि.उपाध्यक्ष म.न.वि.से मा.आनंद मोरे ,शहर अध्यक्ष म.न.वि.से मा.तेजस राठोड ,शहर अध्यक्ष उद्योजक आघाडी मा.अरीफ पठाण, शहर उपाध्यक्ष मा.रोहित फुटाणे,शहर उपाध्यक्ष मा.अजिंक्य कांबळे,शहर उपाध्यक्ष मा.सचिन कणसे, किरण कांबळे, सो.जि.म.न.वि.से प्रसिद्धी प्रमुख मा.महेश डोके मा.अनिल माने योगेश काळे,अमोल जांभळे,राजा कुभांर, विजय हजारे,योगेश काळे,स्वप्निल कवडे इ. पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. तसेच या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन अशोक गोफणे यांनी केले.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE