करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

नगरपरिषद मुला मुलींची शाळा नंबर ४ करमाळा शाळेचे दैदिप्यमान यश

करमाळा समाचार

12डिसेंबर मा. आमदार संस्थेचे अध्यक्ष जयवंतरावजी जगताप साहेब व विश्वस्त माननीय श्री शंभूराजे जयवंतराव जगताप यांच्या संयुक्त. वाढदिवसानिमित्त. महात्मा गांधी विद्यालय करमाळा आयोजित तालुकास्तरीय आंतरशालेय भव्य डान्स स्पर्धेमध्ये नगरपरिषद मुला मुलींची शाळा नंबर 4 करमाळा या शाळेने लहान गटामध्ये ग्रुप डान्स स्पर्धेमध्ये मध्ये तृतीय क्रमांक पटकावला. त्याबद्दल प्रमाणपत्र व चषक देऊन, शाळेचे विद्यार्थी ,मुख्याध्यापिका सौ टांगडे मॅडम, श्री माने सर,भोसले मॅडम श्री मुसळे सर श्री दुधे गुरुजी यांना गौरविण्यात आले.

त्याप्रसंगी गटशिक्षणाधिकारी पाटील साहेब,विस्तार अधिकारी निळ साहेब,संस्थेचे विश्वस्त श्री शंभूराजे जगताप साहेब व शाळेचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते. या यशाबद्दल करमाळा नगरपालिकेचे मुख्याधिकारी श्री बालाजी लोंढे साहेब नगरपालिका शिक्षण मंडळाचे प्रशासनाधिकारी श्री अनिलजी बनसोडे साहेब शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दादासाहेब इंदलकर व सर्व सदस्य, न. प ..शिक्षण मंडळाचे केंद्र समन्वयक श्री दयानंद चौधरी सर यांनी विजयी विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे अभिनंदन केले.

ads
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE