शुल्लक कारणातुन युवकाचा खुन ; पाच जणांवर गुन्हा दाखल
करमाळा समाचार
केम तालुका करमाळा येथे क्षुल्लक कारणावरून एका युवकाचा खून झाल्याची घटना काल घडली होती. या प्रकरणातील पाचपैकी तीन संशयित आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी दिलेल्या फिर्यादीत सांगितलेल्या कारण अगदी सामान्य असले तरी आज एका मुलाला आपला जीव गमवावा लागला आहे.

असे एक गाव नाही जिथे शेतीच्या वादातून भांडण होत नाहीत. पण वाद तात्पुरत्या व कमी प्रमाणात होतात व तिथल्या तिथे मिटवा मीटिंग करून प्रकरणे थांबवली जातात. पण केम येथील प्रकरण भलतेच महागात पडले आहे. एका कुटुंबाला आपला मुलगा तर एका संपूर्ण कुटुंबाला आता जेलची हवा खावी लागणार याची शक्यता आहे.

केम येथील अमोल सुधीर तळेकर वय 19 हा आपला ट्रॅक्टर घेऊन जात असताना भावकीतील भीमराव तळेकर यांच्या शेतातील लाकडावरून ट्रॅक्टर चे मागचे चाक गेले. यावरून तळेकर यांनी अमोल यास शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. शिवीगाळीचा रूपांतर मारहाणीत झाले. त्याच वेळी भीमराव यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांनी अमोल यास पकडून ठेवले. तर भीमराव यांचा नातू अमोल तळेकर यांनी अमोल सुधीर तळेकर यांच्या छातीत तीक्ष्ण हत्याराने वार केले अशी तक्रार अमोल च्या वडिलांनी दिली आहे.
यानंतर करमाळा पोलिसांनी वेगवान तपास करीत यातील संशयित भीमराव तळेकर व त्यांच्या पत्नी व सुनेला अटक केले आहे. तर मुलगा व नातू हे अद्याप पोलिसांना मिळून आले आले नाहीत. त्यांचा शोध सुरू आहे. सदरची कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी विशाल हिरे व पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रवीण साने व पोलीस नाईक प्रदीप पायघन यांनी केली आहे. पुढील तपास साने हे करीत आहेत.