करमाळासोलापूर जिल्हा

कोरोनाच्या सावटाखाली बैलपोळा उत्साहात

करमाळा समाचार – संजय साखरे 

तालुक्याच्या पश्चिम भागात बैलपोळा उत्साहात साजरा
यंदाच्या वर्षी महाभयंकर कोरोना रोगाचे सावट असून देखील शेतकरी राजाने बैलपोळा अगदी उत्साहात साजरा केला.
करमाळा तालुक्याच्या पश्चिम भागातील राजुरी,कोर्टी, सावडी, उंदरगाव, वाशिंबे, पारेवाडी, केत्तुर, पोमलवाडी, भगतवाडी, जिंती ,गुल्मारवाडी, कावळवाडी ,कुंभारगाव, या भागांमध्ये भाद्रपद बैल पोळा साजरा केला जातो.

आज सकाळी सकाळीच सर्व शेतकऱ्यांनी आपल्या सर्जा राजाला धुऊन घेतले त्यानंतर दिवसभर त्याला चांगल्या प्रकारचा आहार दिला आणि संध्याकाळी वेगवेगळ्या रंगांनी रंगून अंगावर झूल टाकून गावातून त्याची वाजत-गाजत मिरवणूक काढली .संध्याकाळी सपत्नीक ” चावर, चावर चांगभलं,,, पाऊस आला चांगभलं,, असे म्हणत पूजा केली व त्यांना गोड पुरणपोळीचा नैवेद्य खाऊ घातला. वर्षभर शेतीमध्ये काबाडकष्ट करून संपूर्ण जगासाठी अन्नधान्य पिकवण्यात शेतकऱ्यांना मदत करणाऱ्या बैलांची शेतकऱ्याने मनोभावे पूजा केली आणि पोळा सण साजरा केला.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE